मुंबई - राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सरकारने दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जवळपास दोन लाख सात हजार अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
महिला व बालविकास विभागाने यासाठी शासन निर्णय जारी करून अंगणवाडी सेविकांना २ हजार रुपये भेट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासाठी सरकारकडून ३८ कोटी, ६० लाख ८४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही भाऊबीज भेट अंगणवाडी सेविकांना अदा करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्तांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राज्यात दोन लाख सात हजार अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात मागील सात महिन्यांपासून त्यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी राज्य सरकारकडून सोपवण्यात आली आहे. दिवाळीची भाऊबीज भेट सरकारकडून लवकरच जाहीर केली जावी, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.
कोविड भत्त्याची अडचण अद्याप कायम
राज्यातील अंगणवाडी सेविकांना महामारी सुरू झाल्यापासून कोविड आणि त्या संदर्भातील विविध प्रकारची कामे सोपवण्यात आली. शहरी भागापासून ते ग्रामीण भागांपर्यंत या अंगणवाडी सेविका त्यासाठी झटत आहेत. त्यांना यासाठी कोविडचा रिस्क भत्ता म्हणून सरकारकडून एक हजार रुपये जाहीर करण्यात आले होते. परंतु मागील काही महिन्यात हे पैसै देखील मिळत नसल्याने अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम यांनी व्यक्त केली.
दैनंदिन भत्त्याचा प्रश्न मार्गी लागावा
अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना कोविड काळात दैनंदिन भत्ता म्हणून 300 रुपये देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्यावरही सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. तर या मागणीनंतर दैनंदिन भत्ता म्हणून दीडशे रुपये देण्याचे नागपूरसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी कबूल केले आहे. मात्र तोही आत्तापर्यंत नियमित मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने भाऊबीजेपेक्षा अंगणवाडी सेविकांच्या दैनंदिन भत्त्यात वाढ करायला हवी होती, अशी मागणी शुभा शमीम यांनी केली.
भाऊबीज भेट : अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांचा मदतनिधी
राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सरकारने दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जवळपास दोन लाख सात हजार अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.