ETV Bharat / city

#JEE: 2 लाख 20 हजार विद्यार्थी जेईई परीक्षेला मुकले; नोंदणी नंतरही 95 हजार विद्यार्थी गैरहजर - JEE exams in india

कोरोनामुळे 'जेईई मेन्स' ही सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी देशभरातून करण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने अट्टहास करत या परीक्षेचे आयोजन केल्याने देशभरात तब्बल दोन लाख 20 हजार विद्यार्थी या परीक्षेला मुकले आहेत. यासंबंधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी ट्विट केले आहे.

human resource minister of india
तब्बल दोन लाख 20 हजार विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेला मुकले आहेत.
author img

By

Published : Sep 11, 2020, 6:20 AM IST

Updated : Sep 11, 2020, 6:34 AM IST

मुंबई - कोरोनामुळे 'जेईई मेन्स' ही सामाईक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी देशभरातून करण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने अट्टहास करत या परीक्षेचे आयोजन केल्याने देशभरात तब्बल दोन लाख 20 हजार विद्यार्थी या परीक्षेला मुकले आहेत. यासंबंधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी ट्विट केले आहे.

  • Out of 8.58 lakh #JEEMains applicants, 6.35 lakhs appeared for the exam. Central & respective State Governments assured all possible assistance to the students, for which I compliment all State Governments as well. This entire effort displayed the spirit of cooperative federalism

    — Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकल्यानंतरही केंद्रीय मंत्री पोखरीयाल यांनी या परीक्षार्थींचे कौतुक केले आहे. केंद्र आणि देशातील राज्य सरकारच्या सर्वतोपरी सहकार्याने जेईई मेन्स परीक्षा सुरळीत पार पडली. यामुळे मी या सर्व राज्य सरकारचे कौतुक करतो, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले. तर विद्यार्थ्यांच्या गैरहजरीबद्दल बोलताना त्यांनी या परीक्षा जानेवारी महिन्यातही झाल्याने आत्ताच्या परीक्षांना बसण्याची विद्यार्थ्यांना गरज भासली नसरणार, असा तर्क लावला आहे. मात्र तरीही आम्ही संख्या किती आहे, याची माहिती घेत असल्याचे पोखरीयाल म्हणाले.

देशभरात जेईई (मेन)च्या परीक्षेला देशभरातून ९ लाख ५३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ लाख ५८ हजार विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. तर या परीक्षेला प्रत्यक्षात नोंदणी करूनही तब्बल ९५ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसून शकले नव्हते. तर जे परीक्षेला बसले, त्यातही तब्बल २ लाख २० हजार आणि नोंदणी करून परीक्षेला न आलेले असे एकूण ३ लाख १५ हजार विद्यार्थी परीक्षेपासून दूर राहिल्याचे समोर आले आहे.

१ ते ६ सप्टेंबर या कालावधीत देशभरातील ६६० परीक्षा केंद्रावर जेईई मेन्सची विविध स्तरातील परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रातून या परीक्षेला १ लाखांपर्यंत विद्यार्थी बसले होते. तर ही परीक्षा राज्यात मुंबई, पुणे, नागपूर या जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाही ७४ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

रविवारी होणाऱ्या 'नीट' परीक्षेकडे सर्वांचे लक्ष

नीट (युजी) ही परीक्षा रविवारी (१३ सप्टेंबर) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेला विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्राची संधी एनटीएकडून देण्यात आली आहे. देशभरात होणाऱ्या नीट (युजी) या परीक्षेला १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर आयोजित केली जाणार आहेत. त्यात सर्वाधिक परीक्षा केंद्र (६१५) महाराष्ट्रात आहेत. राज्यभरातून तब्बल २ लाख २८ हजार ९१४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. जेईईला ज्या प्रमाणे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले, तशीच परिस्थिती या वेळीही होईल, असे जाणकारांनी सांगितले.

Last Updated : Sep 11, 2020, 6:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.