मुंबई - क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे हे राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या रडारवर आहेत. आता मलिक यांनी आपला मोर्चा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्याकडे वळवला आहे. मलिक व मोहित कंबोज यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत.
हेही वाचा - धक्कादायक : गर्भवती पत्नीला पतीने रॉकेल ओतून जाळले; बाळाचा पोटातच मृत्यू, पत्नी गंभीर
'बात निकलेगी तो फिर दूर तलक जा फिर लोग बेवजाह उदासी उदासी का सबब पुचेंगे', असं ट्विट करत या प्रकरणात जर खोलवर गेलो तर बऱ्याच गोष्टी उघड होतील व विनाकारण लोक नाराज होतील, असं सांगत नवाब मलिक यांनी एक प्रकारे इशारा दिला होता.
नवाब मलिक यांच्या ट्विटला भाजप युवा मोर्चाचे मोहित कंबोज यांनी सडेतोड उत्तर ट्विटरच्या माध्यमातूनच दिले आहे.
'अब बात निकल गए है और अब दूर तलक ही जायेगी ,
अब डरो मत भागो मत , तुम्हारे हर पाप का सवाल पूछा जाए गा !' असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.
मुंबईतील क्रूझवर NCB ने केलेल्या कारवाईत भाजपशी संबंधित असलेल्या मोहित कंबोज यांचा मेव्हणा ऋषभ सचदेवा याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. पण त्याला नंतर सोडून देण्यात आले. मुंबईतील भाजपच्या नेत्याने फोन केल्याने ऋषभ याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता.
हेही वाचा - 'मी लस घेतली नाही, घेणारही नाही" इंदोरीकर महाराजांच्या विधानावरून वादंग