ETV Bharat / city

राज्यातील १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, हिंगोलीचे जिल्हाधिकारी बदलले

या बदली सत्रामध्ये हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश सुर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य बियाने महामंडळ अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर जी एस पापळकर यांच्याकडे आता हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तर नांदेड महापालिका आयुक्तपदी एन आर गटणे यांची बदली करण्यात आली आहे.

राज्यातील १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

author img

By

Published : Jul 31, 2021, 8:19 AM IST

मुंबई - राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. मागील १५ दिवसांपूर्वी २० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शुक्रवारी आणखी १४ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत राज्यशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.

या बदली सत्रामध्ये हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश सुर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य बियाने महामंडळ अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर जी एस पापळकर यांच्याकडे आता हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तर नांदेड महापालिका आयुक्त पदी एन आर गटणे यांची बदली करण्यात आली आहे.

बदली करण्यात आलेले अधिकारी-

१) संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.

२) अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.

३) मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.

४) सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.

५) प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.

६) कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.

७) जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.

८) एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.

९) एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.

१०) राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.

११) जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.

१२) रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.

१३) एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.

१४) दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.