ETV Bharat / city

Breaking News: मुंबईत तरुणीवर चार नराधमांकडून सामूहिक बलात्कार

Maharashtra Breaking News
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 22, 2022, 8:12 AM IST

Updated : Jan 22, 2022, 10:38 PM IST

  • A 100-yr-old tree was being cut in Vile Parle area today. I asked BMC officers for permission under which it was being done. I was later forcefully put in police van (in pic 2-screengrab from viral video) & was threatened with an FIR against me: Abhay Azad, Environmental activist pic.twitter.com/eVhwXd9Mm8

    — ANI (@ANI) January 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

22:28 January 22

शंभर वर्ष जुने झाड का तोडले असे विचारणाऱ्या पर्यावरणवाद्यास पोलिसांनी दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी

मुंबई - बीएमसीकडून आज विलेपार्ले भागातील 100 वर्ष जुने झाड तोडण्यात आले. कोणाच्या परवानगीने हे झाड तोडले, असे मी त्यांना विचारले. यावेळे त्यांनी मला बळजबरीने उचलून पोलीस व्हॅनमध्ये बसवले आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, अशी माहिती अभय आझाद या पर्यावरणवादी कार्यकर्त्याने दिली.

19:14 January 22

ठाण्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

ठाणे - शाळा बंद, ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने घरात बसून त्रासलेल्या मुलाने गावावरून आलेल्या मित्रांसोबत पोहण्याचा बेत केला आणि तो जीवावर बेतला असल्याची घटना ठाण्यात शनिवारी घडली. ११ वर्षीय दोन मित्र पोहण्यास फायरिंग रेंज ग्राउंड जवळ, रामबाग, उपवन, ठाणे (प.) येथे गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

17:06 January 22

17:00 January 22

IPL2022 - भारतात प्रेक्षकांविना होणार आयपीएलचे सामने

#IPL2022 भारतात प्रेक्षकांच्या गर्दीविना होणार आहे. वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), मुंबई आणि पुण्यातील डीवाय पाटील स्टेडियम ही संभाव्य ठिकाणे आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

16:35 January 22

मुंबईत मुलीवर चार नराधमांकडून सामूहिक बलात्कार

मुंबई - गोवंडीच्या शिवाजीनगर येथे मुलीवर चार नराधमांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची माहित समोर आली आहे. या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांना पोलिसांकडून अटक इतर आरोपींचा शोध सुरू.

16:12 January 22

मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. गोरेगाव आरे कॉलनी येथून नायजेरियन ड्रग्ज पेडलारला अटक करण्यात आली असून 47 लाख रुपयाचा द्रॉक्स ड्रग्ज जप्त करण्यात आले.

16:09 January 22

नितेश राणे यांची अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई - संतोष परबवर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय मुंबई उच्च न्यायालय मध्ये नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण 27 जानेवारीपर्यंत वाढवले आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ही मुभा देण्यात आली आहे.

16:08 January 22

संतोष परबवर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय मुंबई उच्च न्यायालय मध्ये नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण 27 जानेवारीपर्यंत वाढवले आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ही मुभा देण्यात आली आहे.

14:51 January 22

मुंबईतील आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकासाठी पतंप्रधान मोदींकडून 2 लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमएनआरएफ निधीतून मुंबईतील तारदेव येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असे पीएमओने ट्विट करुन माहिती दिली आहे.

14:14 January 22

Breaking News: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिल्ली भाजपला सोडचिठ्ठी, अपक्ष लढण्यावर ठाम

पणजी - उत्पल पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासोबत दीपक पाऊसकर व ईझींतोर फर्नांडिझ यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

13:33 January 22

Breaking News: मंत्री आदित्य ठाकरे आग लागलेल्या कमला इमारतीची पाहणी करण्यासाठी दाखल

मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आग लागलेल्या कमला इमारतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आग कशामुळे लागली याचा आढावा घेतला.

13:29 January 22

Breaking News : डिसले गुरुजींनी अर्ज द्यावे आम्ही निर्णय घेऊ - शिक्षणाधिकारी

सोलापूर - ग्लोबर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डीसले यांनी स्कॉलरशिप साठी किंवा पीएचडीसाठी नियमानुसार अर्ज द्यावा ,त्यावर विचार करू असे वक्तव्य शिक्षणाधिकारी डॉ लोहार यांनी ईटीव्ही भारतशी फोनवर बोलताना माहिती दिली आहे.पीएचडी किंवा स्कॉलरशिपसाठी त्यांना आम्ही नियमानुसार यावं असे सांगितले होते.आणि सर्व सविस्तर माहिती द्यावी असे सांगितले असताना देखील त्यांनी अर्थाचा अनर्थ केलं आणि माध्यमांसमोर वेगळीच माहिती दिली असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार यांनी सांगितले आहे.

12:30 January 22

Breaking News: भाजप आमदार नितेश राणेंचा जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज

मुंबई - संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार असलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सत्र न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

11:49 January 22

Breaking News : भिवंडीत पती पत्नीची घरातच निर्घृण हत्या, दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ

ठाणे - भिवंडीत पती पत्नीची घरातच निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली. बाळू पाटील आणि त्यांच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनास्थळी गणेशपुरी पोलीस पथक दाखल झाले असून पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.

अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी केला तपास सुरू.

11:34 January 22

Breaking News : बुलडाण्यात सेल्फी काढत नवविवाहितेने केली आत्महत्या

बुलडाणा - काठोरा येथील नवविवाहित महिलेने सेल्फी काढत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. सासरच्या त्रासाला कंटाळून या महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

11:23 January 22

Breaking News : युवकाने तरुणीवर अॅसीडसदृश द्रव फेकले

नागपूर - युवकाने तरुणीवर अॅसीडसदृष द्रव फेकल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. सदर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

11:09 January 22

Breaking News : नाना पाटेकर यांच्याकडून अमोल कोल्हेची पाठराखण

पुणे - अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका केली आहे. त्यांनी केलेल्या या भूमिकेचा सगळीकडून विरोध होत आहे. याबाबत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. अभिनय केला म्हणजे गोडसेंचे समर्थन केले असे होत नाही असे, ना म्हणाले.

11:02 January 22

Breaking News: भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई - शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या इमारतीच्या करातून महापालिकेने सूट दिली आहे. याविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. याबाबत सरनाईक यांना करात दिलेली सूट ही बेकायदेशीर असल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे. आज चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.

11:02 January 22

Breaking News: पणजीतील लढतीवरुन संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई - पणजीत उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष ळडणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पणजीत आता उत्पल यांच्यासारख्या प्रामाणिक आणि दुसरीकडे अप्रामाणिक उमेदवारांमध्ये ही लढत होत असल्याचा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

09:54 January 22

Breaking News: कुरार परिसरात पत्नीचा खून करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई - मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या लक्ष्मण नगर परिसरात पत्नीने चाकूने वार करून खून केला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पतीची प्रकृती चिंताजनक आहे. शताब्दी रुग्णालयात पत्नीला दाखल करण्यात आले आहे होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

09:32 January 22

Breaking News: प्रियंका-निकच्या घरी हलला पाळणा, सरोगसीच्या माध्यमातून झाले आईवडील

मुंबई - प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या घरी पाळणा हलला आहे. सरोगसीच्या माध्यमातून ते आईवडील झाल्याची माहिती प्रियंकाने शेअर केली आहे.

08:56 January 22

Breaking News: रिलायन्सच्या नफ्यात 41 टक्के वाढ

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला तिमाहीचा निव्वळ नफा जाहीर केला आहे. रिलायन्सने जाहीर केलेल्या या तिमाहीच्या आकडेवारीनुसार कंपनीचा नफा 41 टक्के वाढला आहे. हा नफा 18, 549 कोटींवर गेला आहे.

08:36 January 22

Breaking News: एनसीबीने जप्त केले 3.95 किलो इफेड्रीन, पुण्यातून ऑस्ट्रेलियाला पाठवणार होते ड्रग्ज

मुंबई - एनसीबीच्या पथकाने मुंबईत 3.95 किलो ड्रग्ज जप्त केले. हे ड्रग्ज पुण्यातून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते. याबाबत पुढील तपास एनसीबीचे अधिकारी करत आहेत.

08:25 January 22

Breaking News : गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन

मुंबई - ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन झाले. त्या जयराम शिलेदार यांच्या कन्या होत्या. त्यांनी मराठी नाटक आणि नाट्य संगीतात महत्वाचे योगदान दिले आहे.

08:25 January 22

Breaking News: नागपुरातील कुही परिसरात न्यूड डान्स आयोजित केल्याने खळबळ

नागपूर - कुही परिसरात न्यूड डान्स आयोजित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रात्री न्यूड डान्स आयोजित केल्याचे फलक झळकवण्यात आले होते.

08:15 January 22

Breaking News: बालसुधारगृहातील 12 मुलांना कोरोनाची लागण

ठाणे - उल्हासनगर परिसरात असलेल्या बालसुधारगृहातील 12 मुलांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. या बालसुधारगृहात 29 मुलांना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 12 मुलांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

08:01 January 22

मुंबईतील ताडदेव येथील इमारतीमध्ये भीषण आग

मुंबई - ताडदेव येथील इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाटीया रुग्णालयाजवळ ही 20 मजली इमारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Last Updated : Jan 22, 2022, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.