मुंबई - पूरग्रस्त भागातील बचावकार्याचा अहवाल आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने आज रात्री ९.३० वाजता दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागातून सुमारे हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण ११२ मृत्यू झाले असून, ३२२१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ५३ लोकं जखमी असून, ९९ लोकं बेपत्ता आहेत. ३५ हजार ३१३ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे ११२ लोकांचा मृत्यू; ३२२१ जनावरं दगावली - पंचगंगा पातळी
22:27 July 24
राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे ११२ लोकांचा मृत्यू; ३२२१ जनावरं दगावली
22:17 July 24
मिरगाव भूस्खलन : आतापर्यंत 6 मृतदेह मिळाले
पाटण - पाटण तालुक्यातील मिरगाव येथील भूस्खलन दुर्घटनेतील बचावकार्य एनडीआरएफच्या मदतीने सुरू आहे. आतापर्यंत 6 मृतदेह मिळाले आहेत. अजून 4 लोकांचा शोध सुरु आहे.
20:15 July 24
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूण दौऱ्यावर
रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूण दौऱ्यावर आहेत. चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. 11.30 वाजता चिपळूणमध्ये मुख्यमंत्री दाखल होतील. चिपळूणनंतर ते सातारला जाणार आहेत.
19:20 July 24
वरळी येथे लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू
मुंबई - वरळी येथे लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. वरळीतील हनुमान गल्ली येथे ही दुर्घटना घडली आहे. ललित अंबिका या बिल्डींगमध्ये ही लिफ्ट होती. यात सहा ते सात जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
18:15 July 24
कोरोना नियमांचे पालन न केल्याने मालाडमधील डी मार्ट सील
मुंबई - सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यामुळे मालाड येथील डी मार्ट सील करण्यात आले आहे. सहायक आयुक्त मकरंद दगखैर यांनी ही कारवाई केली आहे. मालाड लिंक रोडवर हे डी मार्ट होते. अनिश्चित काळासाठी हे डी मार्ट बीएमसीने सील केले आहे.
17:12 July 24
आंबेघर भूस्खलन अपडेट : आतापर्यंत ११ मृतदेह सापडले
पाटण - मिरगाव येथे 10 ते 11 लोकं आणि ढोकावळे येथे 4 ते 5 लोकं ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. या दोन्ही ठिकाणी शोध आणि मदतकार्य सुरू आहे.
16:37 July 24
केंद्राकडून मदत मिळण्यास वेळ लागेल - मंत्री भुजबळ
मुंबई - 10 किलो तांदूळ, गहू, 5 लिटर रॉकेल देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच ५ किलो डाळ देण्यात येणार आहे. आम्ही अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहेत. केंद्राकडून मदत यायला वेळ लागेल, तोपर्यंत अधिकाऱ्यांनी अर्थसहाय्य द्यावे, किती मृत्युमुखी पडलेत याची आकडेवारी गुलदस्त्यात आहे. जास्तीत जास्त मदत केली जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले. तसेच अनेक शिवभोजन केंद्र वाहून गेले आहेत, दुसऱ्या विभागातील केंद्रांनी भोजनाची व्यवस्था करावी, विद्युत पुरवठा खंडित आहे. अन्न- धान्य पुरवठा ताबडतोब करावा, नियम कोणतेही पाहू नयेत. परिस्थिती नियंत्रणात आल्याचे जिल्हाधिकारी सांगत नाहीत, तोपर्यंत मदत सुरू राहील, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
16:36 July 24
लोकांचा जीव वाचवणे ही प्राथमिकता, बचावकार्यात अडचणी येत आहेत - मंत्री छगन भुजबळ
मुंबई - राज्यावर आलेली पूरस्थिती हे महासंकट आहे. अनेक दरडी कोसल्या आहेत. मातीच्या ढिगाऱ्याखाली सध्याही अनेक नागरिक अडकले आहेत. अनेकजण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेत. बचाव कार्यात अडचणी येत आहेत. हे संकट मोठे आहे, प्रयत्न अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत लोकांचा जीव वाचवणे हा पहिला प्रयत्न असेल, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. औषधोपचार करणे, निवारा, अन्न धान्य आणि पोटापाण्याची व्यवस्था करणे सध्या गरजेचे आहे. तसेच प्रत्येकी 2 करोड रुपये अधिकाऱ्यांना दिले आहेत. सारासार विचार करून खर्च करण्याचे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले आहेत.
15:31 July 24
पूरस्थिती हाताळण्यासाठी सैन्याची 65 जवानांची टीम कोल्हापुरात दाखल
कोल्हापूर - आर्मीची 65 जवानांची एक टीम कोल्हापूर जिल्ह्यात पाचारण करण्यात आली आहे. ही टीम कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ भागात काम करणार आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आर्मीचे जवान सज्ज आहेत. कोल्हापूर विमानतळावर एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या असून, आणखी दोन टिमसुद्धा येणार आहेत. एनडीआरएफ जवानांच्या आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 4 टीम आल्या आहेत. या टीम कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यासाठी असणार आहेत.
13:22 July 24
कोल्हापुरातील बहुतांश महामार्ग वाहतुकीसाठी बंद- कोल्हापूर पोलीस
कोल्हापूर - सांगली रोड वाहतुकीसाठी बंद आहे.
पुणे-बेंगलोर हायवे वाहतुकीसाठी बंद आहे .
कोल्हापूर- रत्नागिरी रोड वाहतुकीसाठी बंद आहे .
कोल्हापूर -गगनबावडा रोड वाहतुकीसाठी बंद आहे .
12:30 July 24
कोयना धरणातून 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
2 लाख 75 क्युसेक पाणी अलमट्टीमध्ये पाणी जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अलमट्टीमधून 3 लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. सध्या सांगली आणि कोल्हापूरमध्ये नद्या धोक्याच्या पातळीबाहेर जाऊन वाहत आहेत.
12:15 July 24
पॉर्न व्हिडिओ निर्मितीमध्ये माझ्या नवऱ्याचा सहभाग नाही - शिल्पा शेट्टी
हॉटशॉट्स संदर्भातील कंटेटची माहिती नाही. हॉटशॉट्स संदर्भात तिचे काही देणेघेणे नसल्याचा दावा राज कुद्राची पत्नी शिल्पा शेट्टीने केला आहे. या पॉर्न व्हिडिओ निर्मिती प्रकरणात तिचा नवरा राज कुंद्रा याचा कसलाही संबंध नसल्याचेही तिने स्पष्ट केले, असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
12:12 July 24
गावात आता काहीच उरले नाही, तळईतील दरडग्रस्त ग्रामस्थाची प्रतिक्रिया
रायगड जिल्ह्यातील तळई गावात दरड कोसळून तेथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावात 40 होती. त्यामध्ये 100 लोक रहात आहेत. गावात आता काहीच उरले नसल्याची माहिती एका ग्रामस्थाने यावेळी दिली,.
12:08 July 24
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे आणि अतिवृष्टीमध्ये ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. त्यांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत द्यावी, तसेच फळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. त्यांनाी आज सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला,.
10:59 July 24
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त आणि दरड कोसळलेल्या भागाचा पाहणी दौरा
मुंबई - शुक्रवारी महाड तालुक्यातील तळईमध्ये दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला. तर पोलादपूरमध्ये देखील १० जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आज महाडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. तळीये येथील दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहेत.
10:44 July 24
पूरग्रस्त भागात ७६ जणांचा बळी, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती
मुंबई - पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवालामध्ये मदत व पुनर्वसन विभागाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे 90 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण 76 मृत्यू झाले असून 75 जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर 38 लोक जखमी असून तीस लोक बेपत्ता आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती
10:40 July 24
वृतपत्र कार्यालयावर छापेमारी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न -संजय राऊत
मुंबई - गेली वर्षानुवर्षे ते स्वाभीमानाची पत्रकारिता करत आहेत. अशाप्रकारे दहशतवादी असल्यासारखे त्यांच्या घरी रेड टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारवाई करण्यात आलेली दोन्ही माध्यमे एक प्रामाणिक पत्रकारिता करतात. गंगेतून वाहणारी प्रेत ही सर्वात मोठी बातमी त्यांनीच दिली होती. त्यामुळे पूर्ण देशाला सत्य माहित पडलं. देशातील बेरोजगारी बद्दल खरे आकडे त्यांनी सांगितले. सरकार कोरोनाबाबत आपले लपवते याची माहिती त्यांनी वृत्तपत्र द्वारे दिली.
सरकारने वृत्तपत्राची स्वतंत्र टिकवून ठेवून हे लोकशाहीच्या प्रमुख स्तंभ म्हणून हे सर्वांचे कर्तव्य आहे. भारत सारखे समाचारावरती कारवाई करून कोणाला वाटत असेल की आम्ही दहशत निर्माण करू शकतो, तर ते भ्रमात आहेत. आणीबाणीमध्ये आमच्या मार्मिकला देखील टाळे लागले होते. तेव्हा सर्वात मोठी क्रांती झाली. जर भारतवृत्त समूह बाबत काही तक्रारी असतील तर नक्कीच चौकशी झाली पाहिजे. पण फक्त ते आपल्या विरोधात आहेत म्हणून अशा प्रकारची छापे टाकणं हे चुकीचे आहे. ते सत्य बाहेर आंतर करून अशा प्रकारच्या धाडी टाकणार हे देशाच्या परंपरेला शोभत नाही
10:14 July 24
मोहाडी तहासीलदाराला 30 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने केली अटक
10:14 July 24
उमरखेड तालुक्यातील निंगणुर नाला पार करताना एक युवक वाहून गेला
10:13 July 24
नागपूर जिल्ह्यातील निर्बंध पुढील आठवड्यात देखील कायम
नागपूर - नागपूर जिल्ह्यातील निर्बंध पुढील आठवड्यात देखील असणार कायम. दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी. शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकान राहणार बंद.
10:09 July 24
नागपूर - छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे यादीत वगळली जाणार
नागपूर - वेळोवेळी मुदत वाढवूनही 2 लाख 27 हजार 900 मतदारांनी छायाचित्र दिले नसल्याने त्यांची नावे आजपासून मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. नागपूर जिल्ह्यात 12 विधानसभा क्षेत्र असून 42 लाख 30 हजार 388 मतदार आहेत, त्यातील 2 लाख 46 हजार 928 मतदारांच्या छायाचित्रांचा यादीमध्ये समावेश नाही. मनपा निवडणुकीसाठी हीच यादी असणार असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
10:08 July 24
परभणी - सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी दहा लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले; मुंबईतील अधिकाऱ्यांची कारवाई
परभणी - सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई सुरू आहे. दहा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी हा छापा मारला. कारवाई सध्या सुरू असून, सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया देखील लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
10:06 July 24
कोल्हापूर- राजाराम बंधारा पाणी पातळी
कोल्हापुरात गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने 55.7 फुटांवर पोहोचली आहे. तर एकूण पाण्याखालील बंधारे - 108, जवळपास अर्धा फुटांनी पाणी पातळी झाली कमी, अनेक भागातील पाणी पातळी होत आहे. राधानगरी धरण पूर्ण भरण्यासाठी अजूनही 3 फुट पाणी वाढण्याची गरज आहे.
09:52 July 24
एनडीआरएफच्या आणखी 4 तुकड्या कोल्हापुरात दाखल होणार
कोल्हापुरातील पुराच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या तीन तुकड्या कोल्हापूरमध्ये पूर्वीच दाखल झाल्या आहेत. आज दुपारी अजून ४ तुकड्या हवाईमार्गे कोल्हापूर विमानतळावर दाखल होत आहेत, अशी माहिती मंत्री सतेज पाटील यांनी दिली.
09:37 July 24
राज्यातील दरड मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांवर खुनाचा गु्न्हा दाखल करा- नितेश राणे
मुंबई - राज्य सरकारकडून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुराच्या भागात आणि दरडग्रस्त भागात मदत पोहोचवण्यास उशीर झाला, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना मदत मिळाली नाही. कोणतीही बोट तिथे उपलब्ध झाली नाही, शिवाय कोणताही अधिकारी संपर्कात नव्हता, त्यामुळे या दुर्घटांनाप्रकरणी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
09:24 July 24
सांगली शहरातील पूरस्थिती, नागरी वस्तीत शिरले पाणी
09:17 July 24
आषाढी पौर्णिमा निमित्ताने मानाच्या सात पालख्या विठुरायाच्या भेटीला.
09:08 July 24
नागपुरात 12 तासात दोन खून
नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या १२ तासात दोन खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
06:52 July 24
BIG BREAKING
रायगड - मौजे तुळये ता.महाड येथे दरड कोसळून 85 व्यक्ती अडकल्या असून त्यापैकी 23 जुलैच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 44 मृतदेह आढळले आहेत. अद्यापही 41 व्यक्ती बेपत्ता आहेत. मौजे तुळई गावाची लोकसंख्या 241 असून त्यापैकी 109 व्यक्ती गावाबाहेर होत्या. 41 व्यक्तींची सुटका करण्यात आली. 6 व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत 13 बैल व 20 गाई अशा एकूण 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली.