मुंबई - राज्यात सोमवारी ४,८७७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात वाढ होऊन मंगळवारी ६२५८ तर बुधवारी ६,८५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज त्यात आणखी वाढ होऊन ७,२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी ५३, मंगळवारी २५४, काल त्यात वाढ होऊन २८६ मृत्यूची नोंद झाली होती. आज त्यात घट होऊन १९० मृत्यूंची नोंद झाली आहे. आज ११,१२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
११,१२४ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ११,१२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,७५,८८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ७,२४२ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून १९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३२,३३५ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७५,५९,९३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,९०,१५६ (१३.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,८७,७०४ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७८,५६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात रुग्णसंख्या वाढली -
कोरोनाचे रविवारी १८ जुलैला ९ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात घट होऊन शनिवारी ६२६९, रविवारी ६८४३ तर सोमवारी ४,८७७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात वाढ होऊन मंगळवारी ६२५८ तर बुधवारी त्यात वाढ होऊन ६,८५७ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज गुरुवारी त्यात आणखी वाढ होऊन ७,२४२ रुग्णांची नोंद झाली.
मृत्यू संख्या वाढली -
१९ जुलै रोजी ६६, २० जुलै रोजी १४७, २१ जुलै रोजी १६५, २२ जुलै रोजी १२०, २३ जुलै रोजी १६७, २४ जुलै रोजी २२४, २५ जुलै रोजी १२३, २६ जुलै रोजी ५३, २७ जुलै रोजी २५४, २८ जुलै रोजी २८६, २९ जुलै रोजी १९० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - ३४१
रायगड - २१२
अहमदनगर - ८३४
पुणे - ६७०
पुणे पालिका - ३४४
पिपरी चिंचवड पालिका - १७५
सोलापूर - ५९०
सातारा - १००९
कोल्हापूर - ४९३
कोल्हापूर पालिका - १६२
सांगली - ६३८
सिंधुदुर्ग - १८९
रत्नागिरी - २५१
बीड - २११
जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या
29 जुलै - 7242 नवे रुग्ण
28 जुलै - 6857 नवे रुग्ण
27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
25 जुलै - 6843 नवे रुग्ण
24 जुलै - 6269 नवे रुग्ण
23 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 7302 नवे रुग्ण
21 जुलै - 8159 नवे रुग्ण
20 जुलै - 6910 नवे रुग्ण
19 जुलै - 6017 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
17 जुलै - 8172 नवे रुग्ण
16 जुलै - 7761 नवे रुग्ण
15 जुलै - 8010 नवे रुग्ण
14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण
हेही वाचा - राज्यातील हे २५ जिल्हे निर्बंधमुक्त होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वपूर्ण घोषणा