ETV Bharat / city

Cannes Film Festival 2022 : कान्ससाठी तीन मराठी चित्रपटांची निवड; सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

कान्स येथे १७ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या ( Cannes Film Festival 2022 ) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

Cannes Film Festival 2022
Cannes Film Festival 2022
author img

By

Published : May 6, 2022, 3:57 PM IST

मुंबई : कान्स येथे १७ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या ( Cannes Film Festival 2022 ) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली.

फ्रान्स येथे होणारा कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १७ मे ते २८ मे दरम्यान होणार आहे. दरवर्षी मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्व वाढविणे या हेतुने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी सहभागी होतात.अशी माहिती सासंकृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

यंदा तीन मराठी चित्रपटांचा समावेश
कान्स फिल्म फेस्टिवल २०२२ च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवावयाच्या ३ मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम,मनोज कदम, महेंद्र तेरेदेसाई व दिलीप ठाकुर या ७ तज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने ३२ चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा", नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं" या चित्रपटांची निवड करण्यात आल्याची माहीती देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा - Cannes 2022: ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीपदी दीपिका पदुकोणची निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.