ETV Bharat / city

राज्यातील आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षा सुरळीतपणे - आरोग्य संचालक - आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळितपणे

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'ड' संवर्गातील एकूण ३,४६२ पदे भरण्यासाठीची लेखी परीक्षा रविवारी सुरळीतपणे पार पडल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

health department exam
health department exam
author img

By

Published : Nov 1, 2021, 2:12 AM IST

मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'ड' संवर्गातील एकूण ३,४६२ पदे भरण्यासाठीची लेखी परीक्षा रविवारी सुरळीतपणे पार पडल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. राज्यातील १३६४ केंद्रांवर परीक्षा पार पडल्या. या परीक्षेसाठी ४,६१,४९७ उमेदवारांनी अर्ज केले होते. ४,१२,२०० उमेदवारांनी प्रवेशपत्र प्राप्त करून घेतल्याचे त्या म्हणाल्या.

परीक्षा प्रक्रिया सुरळीत -

चंद्रपूर, भंडारा, अकोला, मुंबई व ठाणे जिल्ह्यांमध्ये उमेदवारांनी परिक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परिक्षा देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही. कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात आली होते. त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही. याबाबत कोणा उमेदवारांना आपले म्हणणे मांडावे, त्याबाबतची सत्यता तपासून पाहिली जाईल. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी वगळता इतर केंद्रातील सर्व उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा - 100 कोटी वसुली प्रकरणात CBI कडून पहिली अटक.. आता नवीन खुलासे होण्याची शक्यता

बीड येथे तीन उमेदवारांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकरणाव्दारे परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलिसांनी वेळीच या उमेदवारांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.