मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता असल्याची माहिती पोलीसांनी केंद्रीय इंटेलिजन्स ब्युरोला दिली जाणार आहे. परमबीर सिंह यांना शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी केंद्रीय संस्थेची मदत मागणार आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी महाराष्ट्र सरकार करत असल्याची सूत्रांनी दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्य सरकार फरार घोषित करणार असल्याच माहिती मिळत आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देश सोडून परदेशात गेले आहेत? हा प्रश्न सध्या एनआयए मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांना पडला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआए तपास करत आहे. याप्रकरणात चौकशीसाठी एनआयएने परमबीर सिंह यांना अनेकेवळा समन्स पाठवला आहे. पण आजपर्यंत एकही समन्स परमबीर सिंह यांना डिलिव्हर झालेलं नाही. कारण ज्या पत्त्यावर समन्स पाठवण्यात आलेलं आहे, त्या पत्त्यावर परमबीर सिंह नाहीएत. एनआयए आणि महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींना संशय आहे की, ते अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले आहेत.
तपास यंत्रणा परमबीर सिंहच्या शोधात
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगाने मुंबई आणि चंदीगड इथल्या परमबीर सिंग यांच्या पत्त्यावरही अनेक वेळा समन्स पाठवले आहेत, परंतु ते समन्सही परमबीर सिंग मिळालेले नाहीत.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर महाविकास आघाडीने परमबीर सिंग यांच्याविरोधात कारवाई सुरु केली. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी बोलावलं, पण त्यांनीच काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंह यांच्याविरोधआत लुकआऊट नोटीस बजावली होती.
हेही वाचा - ऐन दिवाळीच्या तोंडावर लाल परीच्या टिकीटात दरवाढ; सर्वसामान्याचा खिशाला लागणार कात्री!
काय आहे प्रकरण ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे.
पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा उपयोग
पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.
परमबीर सिंह संदर्भात ते आश्वासन पाळलं येणार नाही
परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज (सोमवारी) राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावरच्या कारवाईसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.परमबीर सिंह याच्यावर कारवाई न करण्याचं आश्वासन आता पाळलं जाण्याची शाश्वती देता येणार नाही, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या आरोपांनंतर या प्रकरणावर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावर देखील अनेक आरोप झाले. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. मात्र परमबीर सिंह यांच्याविरोधात समन्स बजावून देखील ते अद्याप समोर आलेले नसल्यामुळे परमबीर सिंह बेपत्ता असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारने न्यायालयासमोर मांडला आहे.
हेही वाचा - एनसीबी आणि प्रभाकर साईलच्या सुरक्षा मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा - गृहमंत्री