ETV Bharat / city

Fasting of Chhatrapati Sambhaji Raje : मराठा समाजाबाबत छत्रपती संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनांचा राज्य सरकारला पडला विसर.. - State Government Forgets Sambhajiraje Demands

मराठा समाजाला १५ मार्च पर्यंत विविध सवलती देण्यात येतील, नोकरी आणि शिक्षण विषयक अनेक बाबींची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन सरकारने खासदार संभाजीराजे छत्रपती यांना उपोषणादरम्यान दिले ( Fasting of Chhatrapati Sambhaji Raje ) होते. मात्र सरकारने पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मागण्यांना ( Demands Of Maratha Community ) वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे समोर आले ( State Government Forgets Sambhajiraje Demands ) आहे.

मराठा समाजाबाबत छत्रपती संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनांचा राज्य सरकारला पडला विसर..

author img

By

Published : Mar 19, 2022, 3:50 PM IST

मुंबई : मराठा आरक्षणाचे घोंगडे भिजत असल्याने राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरी विषयक अनेक सवलती देऊ केल्या. मात्र या सवलती मिळत नसल्याने खासदार संभाजीराजे यांनी संकल्प अधिवेशनापूर्वी तीन दिवस उपोषण ( Fasting of Chhatrapati Sambhaji Raje ) केले. या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने मंत्री एकनाथ शिंदे आणि दिलीप वळसे-पाटील यांच्याकरवी छत्रपतींना १५ मार्चपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन ( Demands Of Maratha Community ) दिले. मात्र आजपर्यंत या मागण्यांची पूर्तता सरकारने केलेली ( State Government Forgets Sambhajiraje Demands ) नाही. सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून लवकरच त्यांची पूर्तता होईल, असे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

काय होती सरकारची आश्वासने?

सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येतील. सारथीमधील रिक्त पदे १५ मार्च २०२२ पर्यंत भरण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सारथी संस्थेच्या आठ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव १५ मार्चपर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करून घेतला जाईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळला उर्वरित वीस कोटी रुपये उपलब्ध करून देण्याबरोबरच पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि इतर दोन महामंडळांवर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक १५ मार्च २०२२ पर्यंत नियुक्त करण्यात येतील. जिल्ह्यात स्थापन करावयाच्या वसतिगृहांची यादी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देऊन तयार असलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन गुढीपाडव्याला करण्यात येईल. मात्र याबाबत अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही.

आश्वासनांना सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

राज्य सरकारकडून पुन्हा एकदा संभाजीराजे यांनी केलेल्या या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही त्यामुळे आता राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा समाजातील विविध संघटनांनी दिला आहे.

संभाजीराजेंनी समाजाची दिशाभूल करू नये - पाटील

छत्रपती संभाजीराजे यांनी अधिवेशनापूर्वी आंदोलन घेऊन ते गुंडाळण्यामागे काय गौडबंगाल आहे? अधिवेशनामध्ये सरकारला मराठा समाजाच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागू नये म्हणून हा सर्व खटाटोप होता का अशी आता शंका निर्माण होते, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने त्यानंतर संभाजीराजे यांनी का मौन पाळले आहे की केवळ समाजातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी हा सर्व डाव होता, असा आरोपही पाटील यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.