ETV Bharat / city

राज्यात बेरोजगारीचा वाढता आलेख, एकून १४ लाख बेरोजगारांची संख्या; वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. खरी शिवसेना कोणाची यावर शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष दिवसागणिक वाढत आहे. (unemployed in Maharashtra) मागील आठवड्यापासून राज्यात फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांचा टीकेचा भडीमार सुरू आहे. राज्यातील विरोधी पक्ष सामाजिक राजकीय संघटना साऱ्यांनीच सरकारला धारेवर धरले असल्यामुळे राज्यातील बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा अजेंड्यावर आला आहे.

author img

By

Published : Sep 25, 2022, 7:53 PM IST

Updated : Sep 26, 2022, 3:23 PM IST

राज्यात बेरोजगारीचा वाढता आलेख
राज्यात बेरोजगारीचा वाढता आलेख

मुंबई - दहा लाख पुरुष तर ४ लाख महिला बेरोजगार बेरोजगारांच्या समस्येबद्दल सातत्याने देशभर आणि राज्यात शासन प्रकल्प आणल्यानंतर याबद्दल जाहिरात करत आहेत. प्रकल्पाच्या आधी लाखो हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प आले आणि त्याच्यातून इतका रोजगार होईल असे देखील सुरुवातीला सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या सर्व उद्योगांमधून राज्यातील किती व्यक्तींना रोजगार मिळालेला आहे. याची फारशी चर्चा होत नाही. (unemployed in Maharashtra is increasing) शहानिशाही होत नाही. मात्र, राज्यामध्ये (2022 -23)ह्या वर्षात उपलब्ध माहितीनुसार 14 लाख बेरोजगार व्यक्ती असल्याचे केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाच्या ताज्या अहवालात उघड झाले आहे. या एकूण 14 लाखा पैकी दहा लाख पाच हजार 546 पुरुष तर महिला चार लाख 12 हजार 293 आणि ट्रान्सजेंडर 230 अशी नोंद या अहवालात आहे.

व्हिडिओ

अद्याप त्यांना रोजगार मिळालेला नाही - तीन लाखांपेक्षा अधिक पदवीधर बेरोजगार १० वी उत्तीर्ण झालेले आहेत. २ लाख बेरोजगार शाळा कॉलेजनुसार बेरोजगार जे शाळा शिकलेले नाहीत असे साडेचार हजार व्यक्ती आहेत. नववीपर्यंत शिक्षण झालेले 14 हजार 820 हजार आहेत. तर, दहावीपर्यंत शिक्षण झालेले आणि रोजगार नसलेले एक लाख 91 हजार 700 व्यक्ती, तर अकरावी पास झालेले 1190, बारावी पास झालेले एक लाख 29 हजार 728 आहेत. तर डिप्लोमा आणि दहावीनंतर बेरोजगार 26,932 व्यक्ती आहेत. पदवीनंतर तीन लाख 19 हजार 497 लोकांनी नाव नोंदवलेले आहेत. मात्र, अद्याप त्यांना रोजगार मिळालेला नाही.

बेरोजगार नागरिक सहा लाख 80 हजार - पदव्युत्तर अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशन शिकलेले 58 हजार 124 बेरोजगार व्यक्तींनी नाव नोंदवलेले आहे. तर, ज्यांची शैक्षणिक पात्रता काही नोंदवली नाही असे महाराष्ट्रातील बेरोजगार नागरिक सहा लाख 80 हजार आहेत. याबाबत कामगार संघटना नेते आदेश बनसोडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले. '' वय २५ ते ३४ वर्षे या गटात सर्वात अधिक म्हणजे ८ लाख तरुण बेरोजगार आहेत. या सर्वांची नोंद कामगार मंत्रालयाने जॉब सिकर अशी केलेली आहे. म्हणजेच रोजगाराच्या शोधात असलेले अशी केली आहे.'' असे कामगार नेते आदेश बनसोडे यांनी म्हटले आहे.

राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्याने बेरोजगारीत भर - राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्यावर बेरोजगारी वाढणार यासंदर्भात अखिल भारत शिक्षा अधिकार मंचाचे युवक कार्यकर्ते अक्षय पाठक यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. हे केंद्र सरकार यांच्या सांगण्यामुळेच फॉक्सकोन हा प्रकल्प गुजरातला वळवण्यात आलेला आहे. त्यामुळे बेरोजगारी महाराष्ट्राची पुन्हा वाढणार आहे. शासनाने सर्वांना चांगला आणि पुरेसे वेतन देणारा कायमस्वरूपीचा रोजगार आणण्याची नितांत गरज आहे. तर, अर्थव्यवस्थेचे जाणकार कामगार संयुक्त कृती समितीचे नेते विश्वास उटगी यांनी सांगितले की, आपल्या राज्यात नुकताच सेमी कंडक्टर बनवण्याचा प्रकल्प शासनाने हा गुजरातला जाऊ दिला. वस्तू उतपादन करणारे असे कारखाने महत्वाचे आहेत. कारण, चीनच्या तुलनेत आपण अद्याप मागे आहोत. मात्र, मोदी सरकार रोजगाराच्या बाबतीत ठोस काही करत नाही असही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातली बेरोजगारी काही कमी होणार नाही - महाराष्ट्र शासनही ठोस काही करत नाही. मुख्यमंत्री केवळ वलग्ना करीत आहेत. प्रत्यक्षात काम काहीच नाही. म्हणून बेरोजगारी इतकी आपल्याला दिसत आहे. आणि त्यात आता भर पडली आहे. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प गुजरातला जाणीवपूर्वक जाऊ दिला असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे लाखभर तरुणांना ज्या नोकऱ्या मिळायच्या होत्या त्या आता मिळणार नाहीत. गुजरातमध्ये लाखभर तरुणांना नोकऱ्या मिळतील. कारण तिकडे निवडणूक आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्रातली बेरोजगारी काही कमी होणार नाही.

Last Updated : Sep 26, 2022, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.