ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली, १३८४ नव्या रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू - मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली

मध्यंतरी सातत्याने वाढत असलेली मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली ( Mumbai Corona Update ) आहे. आज मुंबईत १३८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली
author img

By

Published : Jan 27, 2022, 7:08 PM IST

Updated : Jan 27, 2022, 7:23 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. रविवारी २५५० रुग्णांची नोंद झाली. सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्या वर रुग्ण आढळून आले आहेत. आज गुरुवारी त्यात घट होऊन, १३८४ नव्या रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Corona Update ) आहे. आज १२ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या मुंबईत १८ हजार ४० सक्रिय रुग्ण आहेत.

२७ इमारती सील

मुंबईत आज (२७ जानेवारीला) १३८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५६८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ४१ हजार ७४७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४ हजार ३८४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ५८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १८ हजार ४० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी १९४ दिवस इतका आहे. मुंबईमधील २७ इमारती सील आहेत. २० जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.३५ टक्के इतका आहे.

९१.८ टक्के बेड रिक्त

मुंबईत आज आढळून आलेल्या १३८४ रुग्णांपैकी ११६२ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १८४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ४२ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,८२७ बेडस असून, त्यापैकी २९२७ बेडवर म्हणजेच ७.७ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९२.३ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्येत घट

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

धारावीत ३ नवे रुग्ण

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटेदरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज २७ जानेवारीला ३ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८५८१ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ८०९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ७२ सक्रिय रुग्ण आहेत.

Last Updated : Jan 27, 2022, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.