नांदेड - सरकारने ओबीसी च्या (OBC Reservation) राजकीय आरक्षणाचं खोबरं करायचं ठेवलंय. असा घणाघात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on OBC Reservation) यांनी केला आहे. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टात मांडला आहे. यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. याला भाजप देखील दोषी आहे. इम्पेरीकल डेटा सहज मिळाला असताना मात्र तो केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला नाही. अशी टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
Prakash Ambedkar On OBC Reservation : सरकारने ओबीसी आरक्षणाचं खोबरं करायचं ठरवलंय; प्रकाश आंबेडकरांची टीका - prakash ambedkar in nanded
ओबीसींवर मुस्लिमांनी अन्याय केला नसून उच्च वर्णीय हिंदू लोकांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांना कधीही निकाली काढायचा नाही. तर त्यांना देशातून पूर्ण आरक्षण बंद करण्याचा अजेंडा आरएसएसचा आहे. त्यामुळे जोपर्यंत यांना सत्तेवरून हटवत नाही, तोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार असेही (Prakash Ambedkar On OBC Reservation ) आंबेडकर म्हणाले.