ETV Bharat / city

Funeral of Pandit Shivkumar Sharma : पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंतिमयात्रेत तबलावादक झाकीर हुसेन यांनी दिला खांदा - Pandit Shivkumar Sharma with state honors

जम्मू-काश्मीरमधील संतूर या लोक वाद्याला जागतिक मान्यता देण्याचे श्रेय शर्मा यांना ( Pandit Shivkumar Sharma bio ) जाते. त्यांचे पार्थिव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जुहू येथे ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात ( Pandit Shivkumar Sharma with state honors ) आला. यानंतर विलेपार्ले येथील पवन हंस अंत्यसंस्कारस्थळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता अमिताभ बच्चन, जया बच्चन, शबाना आझमी, गीतकार जावेद अख्तर, जतीन-ललित आणि गायिका इला अरुण आदींनी अभिजीत सहकारी संस्थेत शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. तबलावादक झाकीर हुसेन ( Zakir Hussain in last funeral of Shivkumar Sharma ) यांनी शिवकुमार यांच्या अंतिम प्रवासात खांदा दिला.

पंडित शिवकुमार शर्मा
पंडित शिवकुमार शर्मा
author img

By

Published : May 12, 2022, 10:05 PM IST

Updated : May 12, 2022, 10:53 PM IST

मुंबई- प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या ( Pandit Shivkumar Sharma last rites ) पार्थिवार बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शर्मा यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांच्या पाली हिल येथील राहत्या घरी मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने ( death of Pandit Shivkumar Sharma ) निधन झाले. त्यांच्या अंतिमयात्रेत प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांनी खांदा दिला.

जम्मू-काश्मीरमधील संतूर या लोक वाद्याला जागतिक मान्यता देण्याचे श्रेय शर्मा यांना ( Pandit Shivkumar Sharma bio ) जाते. त्यांचे पार्थिव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जुहू येथे ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात ( Pandit Shivkumar Sharma with state honors ) आला. यानंतर विलेपार्ले येथील पवन हंस अंत्यसंस्कारस्थळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता अमिताभ बच्चन, जया बच्चन, शबाना आझमी, गीतकार जावेद अख्तर, जतीन-ललित आणि गायिका इला अरुण आदींनी अभिजीत सहकारी संस्थेत शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. तबलावादक झाकीर हुसेन ( Zakir Hussain in last funeral of Shivkumar Sharma ) यांनी शिवकुमार यांच्या अंतिम प्रवासात खांदा दिला.

शर्मा यांच्या पत्नी मनोरमा आणि त्यांची मुले राहुल आणि रोहित, मित्र, पंडित हरी प्रसाद चौरसिया आणि तबलावादक झाकीर हुसेन यावेळी उपस्थित होते. दिवंगत संगीतकाराच्या पार्थिवावर त्यांच्या मुलांनी दीपप्रज्वलन केले आणि त्यानंतर बंदुकीची सलामी दिली. जेव्हा एखाद्या महान व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू होतो, तेव्हा काही गोष्टी बोलल्या जातात जसे की ‘त्याच्यासारखा कोणीच नसेल’, ‘आता अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कोणी भरून काढू शकणार नाही.’ पण शिवाच्या बाबतीत हे केवळ एकच नाही. पण शिवकुमार यांच्याबाबत वस्तुस्थिती असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

काही दशकांपूर्वी जरी तबला, सतार, वीणा, हार्मोनियम सारखी वाद्य सामान्यजनांना माहित असली तरी संतूर नावाचे वाद्य असते हे माहित नव्हते. जम्मू प्रांतातील एक युवक, शिवकुमार शर्मा, संतूर वादनाचे कार्यक्रम करू लागला आणि त्या वाद्याला देशमान्यता मिळाली. संतूर हे मूलतः एक लोक वाद्य आहे. संतूर वरील शास्त्रीय संगीत त्याने प्रसिद्ध केले आणि त्याला आणि संतूरला लोकाश्रय मिळाला. शिवकुमार शर्मा यांनी रागदारी पेश करीत पांडित्य मिळविले आणि ते पंडित शिवकुमार शर्मा म्हणून ओळखले जाऊ लागले. शिवकुमार शर्मा यांनी फक्त पाच वर्षांचे असताना गायन आणि तबला शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या तेराव्या वर्षी संतूर शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी १९५५ मध्ये मुंबईत पहिला सार्वजनिक परफॉर्मन्स दिला तसेच त्यांनी १९६० मध्ये आपला संतूर वादनाचा पहिला एकल अल्बम रेकॉर्ड केला. शिवकुमार शर्मा यांना दोन मुले आहेत जे आपल्या वडिलांच्या संतूर वादकीचा वारसा पुढे नेत आहेत.

पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावर अंतिमसंस्कार

संतूरला लोकप्रिय शास्त्रीय वाद्य बनवण्याचे श्रेय शिवकुमार शर्मा यांना जाते. १९५६ मध्ये व्ही शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील एका दृश्यासाठी त्यांनी पार्श्वसंगीत तयार केले होते. १९६७ मध्ये, त्यांनी बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काबरा यांच्यासमवेत एक संकल्पना अल्बम, कॉल ऑफ द व्हॅली तयार केला, जो भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात लोकप्रिय अल्बम्सपैकी एक ठरला. पुढे, त्यांनी हरिप्रसाद चौरसिया यांच्या सहकार्याने अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आणि ती जोडी शिव-हरी संगीत जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली.

शिव-हरी यांनी प्रामुख्याने यशराज फिल्म्स साठी संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी १९८० मधील यश चोप्रांच्या ‘सिलसिला’ चित्रपटापासून संगीत दिग्दर्शनाला सुरुवात केली. १९८५ साली फासले, १९८९ साली चांदनी, १९९१ साली लम्हे आणि १९९३ साली डर यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. पंडित शिवकुमार शर्मा यांनी 1956 मध्ये आलेल्या झनक झनक पायल बाजे चित्रपटातील एका दृश्यासाठी पार्श्वसंगीत तयार केले होते. चार वर्षांनंतर पंडित शिवकुमार शर्मा यांनी त्यांचा पहिला एकल अल्बम रेकॉर्ड केला. बॉलिवूडमध्ये 'शिव-हरी' (शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया) या जोडीने अनेक हिट गाण्यांना संगीत दिले. श्रीदेवीवर चित्रित झालेल्या 'मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ' या गाण्याचे संगीत या हिट जोडीने दिले होते.

संबंधित बातमी वाचा-Santoor Maestro Pandit Shivkumar Saharma : संतूर वाद्याला जगमान्यता मिळवून देणारे 'पंडित शिवकुमार शर्मा'

संबंधित बातमी वाचा-पंडित शिवकुमार शर्मा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

संबंधित बातमी वाचा-"भारतीय संगीताच्या मानबिंदूचा अस्त" - पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची आदरांजली

Last Updated : May 12, 2022, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.