मुंबई - तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपा कशाप्रकारे सरकार स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. राजीनाम्यानंतर तत्कालीन बंडखोर एकनाथ शिंदे आणि माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दाव्याचा पत्र राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का दिला. तो धक्का म्हणजे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील तसेच देवेंद्र फडणवीस ही कोणतीही मंत्री पद घेणार नाहीत. शपथविधीचा वेळ ठरली होती राजभावनातच संध्याकाळी साडेसात वाजता. मात्र त्यानंतर अचानकपणे राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपच्या वरिष्ठांकडून उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे करण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली.
उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री होता आलेलं नाही - उपमुख्यमंत्री पद हे खरंतर संविधानिक नाही. भारताच्या सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर के 29 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांपैकी 16 राज्यांमध्येच उपमुख्यमंत्री आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आंध्र प्रदेशात सर्वाधिक पाच उपमुख्यमंत्री आहेत. अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री पद हे रिक्त असल्याचा पाहायला मिळत 2014 सेना भाजपच्या सरकारच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद हे स्वतःकडेच ठेवलं होतं. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री पदाचा इतिहास पाहायला गेलं तर जी व्यक्ती उपमुख्यमंत्री झाली ती व्यक्ती त्यानंतर मुख्यमंत्री होऊ शकलेली नाही, असं इतिहास सांगतो.
आजवर झालेले उपमुख्यमंत्री - १९७९ साली काँग्रेसचं सरकार असताना मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. तर उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपूडे होते. याच काळात म्हणजे १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८० मध्ये शरद पवार मुख्यमंत्री तर सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री होते. पुन्हा १९८३ ते १९८५ वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना रामराव अदिक हे उपमुख्यमंत्री होते. १९९५च्या युती सरकारच्या वेळी मनोहर जोशी सुरवातीला आणि नंतर नारायण राणे मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. १९९९ ते २००३ या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ होते. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना विजयसिंह मोहिते पाटील एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी उपमुख्यमंत्री होते. २००४ ते २००८ या वर्षात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आर. आर. पाटील ये उपमुख्यमंत्री होते. २००८ ते २०१० या वेळेत अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तसेच २०१९च्या देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधिमध्ये देखील अजित पवार उपमुख्यमंत्री तर महाविकास आघाडीमध्ये देखील अजित पवार ( NCP Leader Ajit Pawar ) उपमुख्यमंत्री होते. अजित पवार हे सर्वाधिक म्हणजे ४ वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. परंतु अजूनही त्यांना मुख्यमंत्री होता आलेलं नाही.
हेही वाचा - CM Eknath Shinde win Floor Test : एकनाथ शिंदे यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव, १६४ आमदारांचे मत