ETV Bharat / city

१४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार विधिमंडळाचे अधिवेशन - assembly session latest news

१४ आणि १५ डिसेंबरला हे अधिवेशन मुंबईत होत आहे.

assembly
assembly
author img

By

Published : Dec 3, 2020, 3:39 PM IST

Updated : Dec 3, 2020, 4:45 PM IST

मुंबई - विधानसभा व विधानपरिषदेच्या विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली असून विधानसभेच्या अधिवेशनाची तारीखही जाहीर झाली आहे. १४ आणि १५ डिसेंबरला हे अधिवेशन मुंबईत होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. मात्र हे अधिवेशन कधी आणि कोणत्या तारखेला घ्यावे, याचा निर्णय झाला नव्हता. या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांची टीका

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. फक्त दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पाऊस, चक्रीवादळामुळे शेती नष्ट झालेली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, विविध समाजाच्या समस्या आहेत. आज महिला अत्याचार वाढले आहेत. राज्य सरकारला सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची चपराक बसत आहे. पण या सरकारमध्ये अधिवेशन पुढे ढकलण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. आम्ही दोन आठवड्याचे अधिवेशन घ्यावे, अशी गणी केली होती. आम्ही अध्यक्षांना सांगितले केले होते, की अधिवेशन 2 आठवडे घ्यावे. पण त्यांनी ते फेटाळून लावले. आपण सर्व खुल्या करत आहात मात्र दुसरीकडे केवळ अधिवेशनावर निर्बंध आणले जात आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे, अशी आम्ही मागणी केली आहे.

Last Updated : Dec 3, 2020, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.