मुंबई - कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय व्हावी यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला १०० सदनिका हस्तांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र, निर्णय जाहीर झाल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णयाला स्थगिती दिली. तसेच, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांना दिला. यावर भाजपने टीका केली आहे.

हेही वाचा - संप मिटला : आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ, आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा
भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहे. आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. परंतु, कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला. राजकारणाने नीच पातळी गाठली आहे, अशी टीका भातखळकर यांनी आपल्या ट्विटमधून केली.

हेही वाचा - सोने दुकानात चोरी केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन महिलांना अटक