मुंबई - दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या साठी बेकायदेशीर आंदोलन करणे तसेच हिंसक कृत्य करण्याच्या आरोपाखाली हिंदुस्तान भाऊच्या विरोधात पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. विद्यार्थ्यांची माथी आंदोलनासाठी का भडकवली असा सवाल उपस्थित करत खंडपीठाने विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना पाठकच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत कोणताही अंतिम आदेश न देण्याचे निर्देश सोमवार (दि. 14)मार्च रोजी दिले आहेत.
17 फेब्रुवारी रोजी त्याला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केले. मुंबईतही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत युट्यूब ब्लॉगर हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठकला (1 फेब्रुवारी)रोजी अटक केली होती. 17 फेब्रुवारी रोजी त्याला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर कऱण्यात आला.
पाठक यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यास कारवाई
दंडाधिकारी न्यायालयाने विकास पाठक यांना नोटीस बजावत त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई का करू नये अशी विचारणा करत स्पष्टीकरण मागितले होते. पाठक यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यास बजावण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात येईल. मात्र जर स्पष्टीकरण दंडाधिकाऱ्यांना न पटल्यास त्यांच्याकडून भविष्यात सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करणार नाही असे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. त्या नोटीसीला भाऊने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
काय आहे प्रकरण
31 जानेवारी रोजी मुंबईच्या धारावी परिसरात दहावी बारावीच्या ऑफलाईन परिक्षांविरोधात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. यावेळी हिंदुस्तानी भाऊ देखील उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याआधी हिंदुस्तानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्याने विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा देण्याची सक्ती का केली जात आहे? असा प्रश्न करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना चिथवण्यात हिंदुस्तानी भाईचा हात होता हे सिद्ध झाल्यानंतर हिंदुस्तानी भाऊवर 2 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी चिथवल्याप्रकरणी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा
हिंदुस्तानी भाऊ विरोधात इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चिथवल्याप्रकरणी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे,दंगल, महाराष्ट्र पोलीस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद आणि महाराष्च्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - Mobile Ban : आता परीक्षा केंद्रात मोबाईल बॅन; पेपर फुटीनंतर परीक्षा मंडळाची कडक नियमावली