मुंबई महिलांना नोकरीच्या आमीषातून लाखो रुपयांचा गंडा Fraud of rupees through job lure घालण्यात आला आहे. याप्रकरणी बोरीवली पोलीस स्ठानकात Boriwali Police Station तक्रार दाखल करण्यात आली असून सायबर गुन्हेगारांनी या महिलेकडून लाखो रुपये उकळलेत. तब्बल 8 लाख 60 हजार रुपयांचं गंडा या महिलांना घालण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. temptation of earning online money
कामाची सत्यता पडताळणं आणि खबरदारी बाळगणं आवश्यक कोणत्याही लिंकवर क्लिक करताना शंभर वेळा विचार करा, असं अनेकदा पोलिसांकडून सांगण्यात येते. चाळीस वर्षांची बोरीवलीतील महिला कामाच्या शोधात होती. तिने गुगलवर नोकरीसाठी शोध घेतला. ऑनलाईन रिचार्ज स्कीमच्या माध्यमातून पैसे कमावण्याच्या प्रकाराला या महिला बळी पडल्या आणि लाखो रुपये गमावून बसल्या woman lost million rupees earning online money. त्यामुळे ऑनलाईन कामातून घरच्या घरी पैसे earning money work from home कमावण्याच्या जाहिरातींना भुलून जर तुम्हीही असं काम करत असाल, तर त्या कामाची सत्यता पडताळणं आणि खबरदारी बाळगणं आवश्यक आहे.
महिलेला टेलिग्रामवर मेसेज यायला सुरुवात १२ ऑगस्ट रोजी बोरीवली पोलिसांना याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. एका गृहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला गुगलवर नोकरीचा शोध घेत होती. त्यावेळी समोर आलेल्या एका लिंकवर तिने क्लिक केलं. यानंतर या महिलेला टेलिग्रामवर मेसेज यायला सुरुवात झाली. एका वेबसाईटवर या महिलेला रजिस्टर करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यात ई-मेल आयडी, फोन नंबर आणि रिचार्ज स्किममध्ये तिला सहभागी होण्यास सांगण्यात आलं होतं.
अखेर वैतागून महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली या रिचार्जच्या माध्यमातून महिलेला पैसे कमावता येऊ शकतात, असं आधी भासवण्यात आलं. कमिशन म्हणून ही महिला वेबसाईटवरुन पैसे कमावेल, असं आधी आमिष दाखवण्यात आलं. यासाठी आधी महिलेनं 100 रुपये भरले आणि तिला 227 रुपये मिळाले. त्यामुळे ही महिला व्यवहार करत राहिली. असं करता करता महिलेने तब्बल 5 लाख 14 हजार भरले. पण तिला पैसे येणंच अचानक बंद झालं. टेलिग्राम ऍपवरही या महिलेनं तक्रार केली. या वेबसाईटच्या एक्झिक्युटिव्हशी संपर्क साधण्याचा प्रयत्न तिने केला. पण त्याला यश मिळू शकलं नाही. अखेर वैतागून महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली.
हेही वाचा Threatened To Girl इंस्टाग्रामवर मैत्रीनंतर तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी