मुंबई - 'कंगणा टीम' म्हणजेच कंगणा रणौत आणि भाजप आयटी सेल असे समीकरण आहे. तिच्या ट्विट्स आणि वक्तव्यांचा खरा सूत्रधार भाजप आहे. या कृतघ्न महिलेसोबत मिळून राम कदमांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा अपमान केला आहे; अशी बोचरी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत यांनी ट्विटरचा आधार घेत कंगणा आणि भाजपवर निशाणा साधला. "महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगणाचा निषेध केला नाही. कंगना आणि राम कदमांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे." असे ट्विट त्यांनी केले.
-
महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या @Dev_Fadnavis आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या @Dev_Fadnavis आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 4, 2020महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या @Dev_Fadnavis आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 4, 2020
राम कदमांची नार्को टेस्ट..
-
विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 4, 2020विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 4, 2020
सुशांतसिंह प्रकरणात समोर आलेल्या विवेक मोईत्रा याचे राम कदमांशीही संबंध होते. कदमांचे बॉलिवूडमध्येही घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, मोईत्रा याने राम कदमांना ड्र्ग्स पुरवठा केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे, राम कदमांची नार्को टेस्ट केली जावी अशी मागणी सचिन सावंत यांनी यावेळी केली आहे. सुशांतसिंह प्रकरणातीलच संदिप सिंग याने भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन करुन कोणाशी, कशाबाबत चर्चा केली याबाबतही तपास केला जावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी..! उर्मिला मातोंडकरने कंगणाला खडसावलं