ETV Bharat / city

महाड इमारत दुर्घटनेत फक्त गुन्हे दाखल करून चालणार नाही, कठोर शासन करा - देवेंद्र फडणवीस

या इमारतीच्या निर्माण-परवानगी प्रक्रियेतील सर्वांची सखोल चौकशी करायला हवी. तसेच प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. याशिवाय या दुर्घटनेतील दोषींवर केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर त्यांना कठोरात कठोर शासन होईल, हे राज्य सरकारने सुनिश्चित करावे' अशी मागणी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली आहे

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 26, 2020, 7:55 AM IST

Updated : Aug 26, 2020, 8:11 AM IST

मुंबई - रायगड जिल्ह्यातील महाड येथे सोमवारी पाच मजली इमारत कोसळली. यात १४ जणांचा मृत्यू झाला. मात्र, एखादी इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 9 वर्षांतच कशी काय कोसळते? असा सवाल करत या इमारतीच्या निर्माण-परवानगी प्रक्रियेतील सर्वांची सखोल चौकशी करून त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. तसेच केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर त्यांना कठोर शासन होईल, हे राज्य सरकारने सुनिश्चित करावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस
महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळ असलेली तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत सोमवारी कोसळली. अजूनही या इमारतीत अडकलेल्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. यावर मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विधानभवनाबाहेर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले की, 'तारिक गार्डन नावाची ही इमारत 9 वर्षांपूर्वीच तयार झालेली आहे. मात्र, लगेच कशी काय कोसळते. त्यात 12 जणांचे मृत्यू होतात(मृतांचा आकडा १४वर), हे गंभीर आहे. या इमारतीच्या निर्माण-परवानगी प्रक्रियेतील सर्वांची सखोल चौकशी करायला हवी. तसेच प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. याशिवाय या दुर्घटनेतील दोषींवर केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर त्यांना कठोरात कठोर शासन होईल, हे राज्य सरकारने सुनिश्चित करावे' एनडीआरएफचे कौतुक -

महाड येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील एनडीआरएफच्या जवानांनी न थकता केलेल्या प्रयत्नांना फडणवीसांनी सलाम केला आहे. एनडीआरएफच्या बचाव कार्यामुळे अनेक प्राण वाचू शकले. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. जखमींना लवकर आराम मिळो,अशी प्रार्थना करत, असल्याचेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

Last Updated : Aug 26, 2020, 8:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.