मुंबई - भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आता १८ जानेवारीला सुनावणी होणार आहे. परंतु, या प्रकरणी आम्हाला महाविकास आघाडी सरकारवर ( Suspended MLA Sanjay Kute criticize maha vikas aghadi ) नाही तर, सर्वोच्च न्यायालयावर ( Sanjay Kute on supreme court ) पूर्ण विश्वास असून, तिथे आम्हाला नक्की न्याय मिळेल, असा आशावाद निलंबित आमदार संजय कुटे ( Suspended MLA Sanjay Kute ) यांनी व्यक्त केला आहे.
न्यायालयावर पूर्ण विश्वास
मागच्या वर्षी झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मागच्या महिन्यात १४ डिसेंबरला या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असताना पुन्हा एकदा या संदर्भामध्ये विधिमंडळ सभागृहात विनंती अर्ज करावा, असेही त्यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने या निलंबित १२ आमदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये विनंती अर्ज विधिमंडळ सभागृहात सादर केला होता. परंतु, त्यावरही काही निर्णय घेतला गेला नाही. आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली व पाच तास झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. आमदारांचे निलंबन हा सभागृहाचा निर्णय असून ६० दिवसांपेक्षा जास्त दिवस आमदारांना निलंबित करता येत नाही, असेही न्यायालयाने सांगितले आहे. आता ही सुनावणी १८ जानेवारीला ठेवण्यात आली आहे. याबाबत बोलताना भाजपचे निलंबित आमदार संजय कुटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
मागच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमचा आवाज दाबण्यात आला. आम्हाला निलंबित करून आमच्या आमदारांची संख्या कमी करण्याचे षडयंत्र सरकारने रचल्याचा आरोप कुटे यांनी केला आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत, ते पाहता त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा असून, तिथे आम्हाला न्याय भेटेल, असा आशावादही संजय कुटे यांनी व्यक्त केला.
हेही वाच - राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश; 8 ‘सुवर्ण’सह एकूण 30 पदकांची कमाई