मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी 6 फेब्रुवारी 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर असणार आहे. याशिवाय आजपासून (शनिवारी) ठाणे आणि दिव्या पाचवी सहावी मार्गिकेच्या कामासाठी तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी या ब्लॉकमुळे सोमवारपर्यंत अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे रेल्वे स्थानका दरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई/ वडाळा रोड स्थानकातून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या आणि सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे /गोरेगाव करिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/ वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. विशेष म्हणजे या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.
72 तासाचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मालिकेच्या कामासाठी ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान जलद मार्गावर तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा मेगाब्लॉक आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉग कालावधी मध्य रेल्वेमार्गावरील 175 पेक्षा अधिक लोकल ट्रेन आणि 43 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेले आहे. याशिवाय 40 पेक्षा जास्त गाड्या या शॉर्ट टर्मिनेशन आणि शॉर्ट टर्मिनेश करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.