ETV Bharat / city

अनिल देशमुख आणि परमबीर सिंह कुठे आहेत हे राज्य सरकारला माहिती नाही; अजित पवारांचा खुलासा - anil deshmukh latest news

सीबीआय आणि ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. तर परमबीर सिंह यांच्यावर आपल्या विभागात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून, या संबंधीचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By

Published : Sep 30, 2021, 3:07 PM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे दोघेही तपास यंत्रणांना सापडत नाहीत. सध्या हे दोघे नेमके कुठे आहेत हे राज्य सरकारला माहिती नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हेही वाचा - राज्यपाल भाजपचा अजेंडा चालवतात, नवाब मलिक यांची टीका

  • वेगवेगळ्या तपास यंत्रणांमार्फत सुरूये तपास -

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अवैधरित्या 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. तर परमबीर सिंह यांच्यावर आपल्या विभागात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून, या संबंधीचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

  • सर्व विभागाच्या प्रस्तावाबाबत उद्या माहिती घेणार -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदांबाबत सर्व विभागांना रिक्त पदाची माहिती गोळा करण्यासाठी उद्याचा(1 ऑक्टोबर) दिवस शिल्लक आहे. कालच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रत्येक विभागातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती संदर्भात असलेल्या जागेबाबत प्रत्येक विभागाचा आढावा घेण्याच्या पुन्हा सूचना केली असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

  • मागासवर्गीय आयोगाला लागणारी सर्व मदत पोहोचवणार -

राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगाला लागणारी प्रत्येक मदत राज्य सरकार पोहचवण्यासाठी तत्पर आहे. काल, 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागासवर्गीय आयोगाशी संपर्क साधला. तसेच आयोगाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक बाबी पुरवल्या जाणार आहेत, त्यासंदर्भातले पत्र दिले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा - केंद्र सरकार राज्याच्या निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा अजित पवारांचा आरोप, म्हणाले....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.