मुंबई - एसटी महामंडळाने एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहिम सुरु केली आहे. मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबंधितांकडून चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. हा दंड टाळण्यासाठी प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
15 दिवस चालणार कारवाई अभियान
प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ (१५ दिवस) या कालावधी दरम्यान एसटी महामंडळ तिकिट तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचाही समावेश केला जाणार आहे. हे सर्व अधिकारी विनातिकीट प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम राबविणार आहेत. यावेळी विनातिकट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून चुकविलेल्या भाड्या व्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये १०० यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल. त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. तसेच आपले तिकीट काळजीपूर्वक जपून ठेवावे, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
प्रवाशांमध्ये जागरूकता
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात हे तिकिट तपासणी
मोहीम राबविण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून दरवर्षी हे मोहीम राबविले जाते. तसेच या मोहिमेचा उद्देश प्रवाशांमध्ये जागरुकता निर्णमा करण्याचा आहे. या मोहिमेत प्रवासी किंवा वाहक दोषी आढळल्यास त्याच्यावर वाहतूक नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल. याउलट बारमाही एसटी महामंडळाची ही कारवाई सुरूच असते. मात्र, ही 15 दिवसांच्या तिकिट तपासणी मोहीम विशेष म्हणजे प्रवाशांचा जागरुक करण्याचा उद्देश आहे.
हेही वाचा - कर्नाटक: गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अपार्टमेंटमध्ये भीषण आग; दोघांचा मृत्यू