ETV Bharat / city

8 People Injured Car Accident : घाटकोपरमध्ये कारच्या धडकेत 8 जण जखमी; पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात

घाटकोपर परिसरात भरधाव कारने ८ जणांना 8 people injured in speeding car in Ghatkopar धडक दिली. या धडकेत २ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

प्रातिनिधीक
प्रातिनिधीक
author img

By

Published : Sep 21, 2022, 5:26 PM IST

Updated : Sep 21, 2022, 8:53 PM IST

मुंबई - घाटकोपर परिसरात भरधाव कारने ८ जणांना 8 people injured in speeding car in Ghatkopar धडक दिली. या धडकेत २ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

माहिती देताना पोलीस

विद्यार्थी देखील या परिसरातून जात होते - घाटकोपरच्या सुधा पार्क परिसरात एका भरधाव कारने तीन रिक्षा टेम्पो आणि दुचाकीला धडक दिली. या घटनेमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्यांसह सातजण जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रिक्षाचालक राजू यादव हा त्याच्या मित्रासोबत सुधा पार्क परिसरात पार्क केलेल्या कारमध्ये बसला होता. अचानक त्याने गाडी स्टार्ट केली आणि त्याचा पाय एक्सीलेटरवर पडला आणि या भरधाव कारने तीन रिक्षा आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला तसेच काही पादचाऱ्यांना धडक दिली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी काही शाळकरी विद्यार्थी देखील या परिसरातून जात होते.

कारवाई केली जाईल - घटनेमध्ये एक विद्यार्थी देखील जखमी झाला आहे. या घटनेनंतर तात्काळ स्थानिक रहिवाशांनी जखमींना राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केले. कारचालक राजू यादव याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पंतनगर पोलीस करत आहेत. पोलीस उपयुक्त प्रशांत कदम यांनी माहिती दिली की, आम्हाला गारुडीया नगर १ वाजताच्या सुमारास कॉल आला होता की अपघात झाला आहे. (ह्युंदाई अक्सेंट कार एमएच ०३डीबी ०४७१)या कारने तीन रिक्षा आणि ५ पादचारींना उडवले. सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. संबंधित कार चालकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यातील चालक रिक्षाचालक आहे. त्याच्या मित्राची कार आहे. तो चार्जिंग करण्यासाठी कारमध्ये बसला होता. त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असही ते म्हणाले आहेत.

Last Updated : Sep 21, 2022, 8:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.