ETV Bharat / city

Money Laundering Case : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरून विशेष पीएमएलए न्यायालयाची ईडीला नोटीस - Anil Deshmukh regular bail

मनी लाँड्रिंग प्रकरणात ( Money Laundering Case ) अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. याबाबत 4 फेब्रुवारी रोजी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालय सुनावणी होणार आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख
author img

By

Published : Jan 28, 2022, 4:54 PM IST

Updated : Jan 28, 2022, 5:49 PM IST

मुंबई - कथित 100 कोटी वसुली प्रकरणात ( 100 Carod Money Laundering Case ) माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना अटक केली होती. ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांनी गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात आज PMLA कोर्टाने ईडीला नोटीस बजावली असून या अर्जावर 4 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात ( Special PMLA court issues notice to ED ) आली असून उपस्थित राहण्याचे निर्देश मुंबई सत्र PMLA न्यायालयाने दिले आहे.

जामीन अर्जावर 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी -

अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर गुरुवारी अनिल देशमुख यांनी PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. आता या अर्जावर 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांना दिलासा मिळतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला -

अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. पण देशमुखांना जामीन मिळणे कठीण होऊन बसले आहे. विशेष म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला आहे. देशमुख आणि राज्य सरकारला हा सर्वात मोठा झटका आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्याकडून विशेष पीएमएलए कोर्टात गुरुवारी अर्ज करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती.

अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र -

100 कोटी कथित प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 78 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांची पत्नीचा भाऊ यांना देखील सहा आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

हेही वाचा - Anil Deshmukh : परमबीर यांचे परमसत्य सांगण्याची परवानगी द्या, अनिल देशमुख यांची आयोगाला विनंती

Last Updated : Jan 28, 2022, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.