ETV Bharat / city

Kirit Somaiya Bail Rejected : किरीट सोमैयांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता; अटकपूर्व जामीन फेटाळला - आयएनएस विक्रांत अपहार प्रकरण

INS विक्रांत निधी अपहार प्रकरणी (INS Vikrant Cheating Case) भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) आणि त्यांचे सुपुत्र निल सोमैया यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी सोमैयांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करत न्यायालयाने सोमैयांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला (Kirit Somaiya bail rejected) आहे.

Kirit Somaiya
किरीट सोमैया
author img

By

Published : Apr 11, 2022, 6:06 PM IST

Updated : Apr 11, 2022, 7:12 PM IST

मुंबई - INS विक्रांत निधी अपहार प्रकरणी (INS Vikrant Cheating Case) भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) आणि त्यांचे सुपुत्र निल सोमैया यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी सोमैयांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करत न्यायालयाने सोमैयांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला (Kirit Somaiya bail rejected) आहे. त्यामुळे अटकेपासून कुठलेही संरक्षण न दिल्याने सोमैया यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

INS विक्रांत अपहार झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमैया यांच्यावर केला होता. यानंतर या प्रकरणात माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर सोमयांविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ट्रॉम्बे पोलीस आणि मुंबई आर्थिक गुन्हे शाखा संयुक्तरित्या करत आहे.

सोमैयांच्या वकिलांचा युक्तिवाद - सुनावणीवेळी किरीट सोमैया यांचे वकील अशोक मूंदरगी यांनी युक्तिवाद केला की, आम्ही निधी जमा करायला राज्यपाल भवनमध्ये गेलो होतो, तेव्हा त्यांनी सांगितले होते की अशाप्रकारे निधी जमा करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही. त्यानंतर आम्ही सर्व रक्कम आमच्या पार्टीमध्ये जमा केली.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद - किरीट सोमैया यांच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या युक्तिवादावर सरकारी वकील यांच्याकडून सांगण्यात आले की, आम्हाला या प्रकरणात आरोपींची चौकशी करण्याकरिता पोलीस कोठडी आवश्यक आहे. आयएनएस विक्रांत वाचण्याकरिता ज्या कोणी लोकांनी पैसे गोळा केले आहेत, या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे. किरीट सोमैया यांनी पार्टीला हा निधी जमा केला असेल तर त्याची देखील चौकशी करण्यात येणार आहे, असे सरकारी वकील प्रदिप घरत यांनी युक्तिवादावेळी म्हटले आहे.

संजय राऊतांनी काय आरोप केले? - शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमैयांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमैयांनी सांगितले होते. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबतही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. हा देशद्रोहीपणा असून, त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असे आवाहनही राऊत यांनी केले होते. सोमैया हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांना माहिती असल्याचेही राऊत यांनी सांगितले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोमैया पिता-पुत्रांना चौकशीसाठी समन्स - किरीट सोमैया आणि त्यांचे पुत्र नील सोमैया यांना काल पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र, सोमैया पिता-पुत्र चौकशीला हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. आयएनएस विक्रांतच्या बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमैया यांच्याविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमैया पितापुत्रांना समन्स बजावले होते. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु ते चौकशीला हजर राहू शकले नाहीत.

सोमैया यांच्या वकिलांनी याबाबत माहिती देताना सांगितले होते की, आम्हांला एफआयआरची प्रत आज मिळाली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज किरीट सोमैया दिल्लीत आहेत. नील सोमैया यांचेही ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे आज किरीट सोमैया आणि नील सोमैया चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पत्र दिले आहे. 13 एप्रिलनंतर कधीही सोमैया पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहतील.

Last Updated : Apr 11, 2022, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.