ETV Bharat / city

दक्षिण आफ्रिकेतील कोरोना म्युटेशनला घाबरू नका - डॉ. बडवे

याला घाबरू नका, पण काळजी घेण्याची मात्र गरज आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीचा वापर अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jan 12, 2021, 2:52 PM IST

Updated : Jan 12, 2021, 3:10 PM IST

मुंबई - कोरोना, ब्रिटन कोरोना, बर्ड फ्लू असे एका मागोमाग एक संकट राज्यावर येत आहेत. त्यात नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या म्युटेशनची भर पडली आहे. खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या एका अभ्यासातून दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या E484K म्युटेशनचे 3 रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. मात्र या म्युटेशनला घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण हा म्युटेशन आपल्याकडे सप्टेंबरमध्येच आला आहे. हा म्युटेशन घातक असता तर रुग्णसंख्या आणि मृत्यू दर इतका कमी झाला नसता. तेव्हा याला घाबरू नका, पण काळजी घेण्याची मात्र गरज आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीचा वापर अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

700 नमुन्याची तपासणी

टाटा कॅन्सर रुग्णालयाने 700 जणांचे स्वब तपासणीसाठी घेतले होते. यासंबंधीच्या अहवालात 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या तिघांना दक्षिण आफ्रिकेतील म्युटेशनची लागण झाल्याचे समोर आले. या म्युटेशनमध्ये अँटिबॉडिज प्रभावी ठरत नसल्याने हा म्युटेशन घातक मानला जातो. पण भारतात या म्युटेशनला घाबरण्याची गरज नाही. याचे मुख्य कारण एक तर 700 पैकी केवळ 3 रुग्ण या म्युटेशनचे आढळले आहेत. तर हे तिघेही ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यातील एकाला तर कोणतेही उपचार करण्याची ही गरज पडली नाही, असेही डॉ बडवे यांनी सांगितले आहे.

'...अन्यथा रुग्ण-मृत्यूदर वाढला असता'

सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील या म्युटेशनचा शिरकाव भारतात झाल्याचे म्हटले जाते आहे. अशावेळी आतापर्यंत केवळ 3 रुग्ण या म्युटेशनचे आढळून आले आहेत. जर हा म्युटेशन घातक असता तर आतापर्यंत मुंबईसह देशातील रुग्णांची संख्या प्रचंड वाढली असती. आज राज्याचा, देशाचा मृत्यूदर खाली आला आहे. तेव्हा जर हा म्युटेशन घातक असता तर आज उलट चित्र असते. रुग्ण आणि मृत्यू दर प्रचंड वाढला असता. त्यामुळे या म्युटेशनची चिंता करण्याची गरज नाही, असेही डॉ बडवे सांगतात. दरम्यान, भारतात 10 लाखांच्या मागे 100 जण कोरोना संक्रमित असताना अमेरिकेत वा इतर देशात 10 लाखांच्या मागे 1100 जण संक्रमित झाले आहेत. त्यामुळे भारतात कोरोना नियंत्रणात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Jan 12, 2021, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.