ETV Bharat / city

पालिकेच्या स्थायी समितीत तब्बल ६०० प्रस्ताव मंजुरीसाठी, प्रस्ताव मलईदार असल्याचा भाजपाचा आरोप - मुंबई महापालिका स्थायी समिती लेटेस्ट न्यूज

कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून लॉकडाऊनदरम्यान मुंबई महानगर पालिकेच्या समित्या आणि सभागृहाच्या बैठक झाल्या नाहीत. गेले सहा महिने पालिका आयुक्त आपल्या अधिकारात सर्व प्रस्ताव मंजूर करत आहेत. मात्र, मोठ्या खर्चाच्या प्रस्तावांना पालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी आवश्यकता असते. असे तब्बल ६०० प्रस्ताव पालिका प्रशासनाने आता एकत्र मंजुरीसाठी आणले आहेत. हे प्रस्ताव मलईदार असल्यानेच एकदम मंजुरीसाठी आणल्याचा आरोप भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे न्यूज
भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे न्यूज
author img

By

Published : Oct 13, 2020, 8:55 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आर्थिक खर्चाच्या कामांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागते. मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेल्या सहा महिन्यात स्थायी समितीची बैठक झाली नव्हती. या सहा महिन्यातील तब्बल सहाशे प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. एकाच बैठकीत इतके प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याने भाजपाने त्याला विरोध केला आहे. हे प्रस्ताव मलईदार असल्यानेच एकदम मंजुरीसाठी आणल्याचा आरोप भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. यादरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून मुंबई महानगर पालिकेच्या समित्या आणि सभागृहाच्या बैठक झालेल्या नाहीत. गेले सहा महिने पालिका आयुक्त आपल्या अधिकारात सर्व प्रस्ताव मंजूर करत आहेत. मात्र, मोठ्या खर्चाच्या प्रस्तावांना पालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी आवश्यकता असते. असे प्रस्ताव पालिका प्रशासनाने आता एकत्र मंजुरीसाठी आणले आहेत. येत्या स्थायी समितीच्या बैठकीत असे तब्बल ६०० प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले आहेत.

हेही वाचा - जमीन मालकाच्या त्रासाला कंटाळून सालगड्याची आत्महत्या; अंबाजोगाई येथील प्रकार

एकाच बैठकीत ६०० प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याने त्यावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. इतके प्रस्ताव एकाच बैठकीत आणण्याचे कारण काय, असा प्रश्न भाजपाने उपस्थित केला आहे. स्थायी समिती सदस्यांना इतक्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. प्रस्ताव मंजुरीसाठी आणताना क्रमवारीत आणावे लागतात. मात्र, मंजुरीसाठी आणण्यात आलेले प्रस्ताव हे क्रमवारीत आणण्यात आलेले नाहीत. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आणलेले प्रस्ताव हे मलईदार प्रस्ताव असल्यानेच ते मंजुरीसाठी आणण्यात आल्याचा आरोप भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

हेही वाचा - प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणतात कोल्हापूरचा 'नादच खुळा'; कारण माहितेय का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.