ETV Bharat / city

Mayor Kishori Pednekar : लस न घेणाऱ्यांचे ८४ टक्के मृत्यू! लस घेऊन सुरक्षित व्हा -किशोरी पेडणेकर - मुंबई महापौर किशोरीताई

कोरोनाच्या रुग्णांचा २०२१ पासून आतापर्यंत झालेल्या मृत्यूपैकी (Mayor Kishori Pednekar on Corona) ८४ टक्के मृत्यू हे लस न घेतलेल्या नागरिकांचे झाले आहेत. (Corona Patients Decrease in Mumbai)  यामुळे मुंबईकर नागरिकांनी लस घेऊन (Mumbiker Follows Rules of Covid) आपल्याला कोरोनापासून सुरक्षित करावे असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

महापौर किशोरीताई पेडणेकर
महापौर किशोरीताई पेडणेकर
author img

By

Published : Jan 12, 2022, 12:29 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारदरम्यान रुग्णांचा मृत्यूही होत आहे. फेब्रुवारी २०२१ पासून आतापर्यंत झालेल्या मृत्यूपैकी ( Mayor Kishori Pednekar on Corona ) ८४ टक्के मृत्यू हे लस न घेतलेल्या नागरिकांचे झाले आहेत. ( Corona Patients Decrease in Mumbai ) यामुळे मुंबईकर नागरिकांनी लस घेऊन ( Mumbiker Follows Rules of Covid ) आपल्याला कोरोनापासून सुरक्षित करावे असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

महापौर किशोरीताई पेडणेकर

८४ टक्के मृत्यू हे लस न घेतलेल्यांचे -

मुंबईत मार्च २०२० मध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. ( Mumbai Corona Patients ) तर, तिसरी लाट थोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान ९ लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १६ हजाराहून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्यावर्षी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ( Mumbiker Follows Rules of Covid ) मुंबईत लसीकरण मोहीम ( Restrictions in Mumbai ) सुरू झाल्यावर ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे होत आहे अशा लोकांमध्ये लस न घेतलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. फेब्रुवारी २०२१ पासून आतापर्यंत जे मृत्यू झाले आहेत त्यात ८४ टक्के मृत्यू हे लस न घेतलेल्या नागरिकांचे झाले असल्याचे समोर आले आहे.

स्वतःला सुरक्षित करा -

कोरोना प्रतीबंधक लस घेतल्याने कोरोना किंवा ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला तरी रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची वेळ क्वचित येते. लस घेतलेल्या नागरिकांचे मृत्यू होत नाहीत. लस घेतल्याने नागरिकांचा विषाणूपासून बचाव होतो. यामुळे मुंबईकरांनी लस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

मुंबईकर नियमांचे पालन करत आहेत

मुंबईमध्ये महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, मागील तीन दिवस रुग्णसंख्या कमी नोंद झाली. रुग्णसंख्या कमी झाली हे सर्वांचे श्रेय असून यावरून मुंबईकर नियमांचे पालन करत आहेत हे दिसत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

पालिका, मुंबईकरांचे यश -

मुंबईमध्ये गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. तीन दिवस रुग्णसंख्या 20 हजारांवर गेली होती. त्यात घसरण होऊन 19 हजार व नंतर 13 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. आजही रुग्णसंख्या कमी असणार आहे. राज्य सरकारने आणि पालिकेने जे निर्बंध लावले आहेत त्याचे पालन मुंबईकर करत आहेत. कोणतेही निर्बंध लावताना घाई केली जात नाही. यामुळे निर्बंध लागू करेपर्यंत रुग्णसंख्या वाढली होती. आता निर्बधांचे पालन केले जात असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. हे पालिका प्रशासन आणि मुंबईकरांचे यश आहे, असे महापौर म्हणाल्या.

हेही वाचा - कालीचरण महाराज वर्धा पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयात केलं हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.