ETV Bharat / city

धक्कादायक : मुलानेच सैनिक पित्याचा केला खून; घरगुती कारणांतून झाला होता वाद - सैनिक वडिलांची मुलाने केली हत्या

अर्धापूर शहरातील लहुजी नगरातील सेवानिवृत्त सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे घरी असतांना मुलगा विजय नारायणराव साबळे यांनी घरगुती कारणांमुळे वाद घालून वडील नारायणराव लक्ष्मण साबळे यांना लाथा-बुक्या व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. सरकारी रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

Shocking: The soldier's father was killed by his son
धक्कादायक : मुलानेच सैनिक पित्याचा केला खून; घरगुती कारणांतून झाला होता वाद
author img

By

Published : Nov 7, 2021, 2:55 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर शहरात राहणारे माजी सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे यांना स्वतःच्या मुलानेच दगडाने जबर मारहाण करून खून केल्याची घटना दि.६ शनिवारी रोजी दुपारी घडली आहे. या खून प्रकरणी शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे.

पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू -

अर्धापूर शहरातील लहुजी नगरातील सेवानिवृत्त सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे घरी असतांना मुलगा विजय नारायणराव साबळे यांनी घरगुती कारणांमुळे वाद घालून वडील नारायणराव लक्ष्मण साबळे यांना लाथा-बुक्या व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. सरकारी रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

तिघांवर गुन्हा दाखल -

सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांच्या खून प्रकरणी दिलीप नारायण साबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय नारायणराव साबळे, शुभम विजय साबळे आणि एका महिलेसह तीन जणांविरूद्ध कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

हेही वाचा - वाशिम : लग्न लावत नाही म्हणून मुलाने केली बापाची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.