मुंबई - हिवाळी अधिवेशनाला (Winter session 2021) बुधवारपासून सुरुवात झाली. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) अधिवेशनात उपस्थित राहिल नाही. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत विरोधकांना उत्तर दिले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Sanjay Raut scolds PM Narendra Modi ) उपस्थित नव्हते. त्यांची तर तब्येत तंदुरुस्त होती, असे म्हणत त्यांनी टीका केली.
आम्ही संसदेत पंतप्रधानांना शोधत होतो. ते कुठेही दिसले नाहीत. अधिवेशन काळात ते यूपी किंवा इतर ठिकाणी दिसत होते. ते तंदुरुस्त आहेत. पंतप्रधानांनी सभागृहात राहणे आवश्यक आहे, अशी प्रथा आहे. उद्धव ठाकरे यांची तब्येत मधल्या काळात चांगली नव्हती. पण ते बैठकांमध्ये सूचना करत चांगलं काम हाताळत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
रामजन्मभूमी घोटाळा -
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीकडून फक्त कारवाया सुरू आहेत. आयोध्येतील राम मंदिर परिसरात भाजपाकडून अनेक जागाची खरेदी करण्यात आली आहे. तिथेच एखादे ईडीचे कार्यालय थाटले तर राष्ट्रावर मोठी कृपा होईल. त्यामुळे राम मंदिर निधीमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची चौकशी करणे सोपे जाईल, अशीही टीका त्यांनी केली.
विरोधकांची मुख्यमंत्र्यावर टीका -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले अनेक दिवस आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहू शकलेले नाहीत. हिवाळी अधिवेशनात उपस्थितीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. राज्याचे अधिवेशन सुरू आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाही, म्हणजे राज्य नेमके चालवत कोण आहे? राज्याचा चार्ज कोणाकडे दिला आहे? हे आम्हाला माहीत नाही. रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार आहेत, अशी चर्चा आहे, ते तरी जाहीर करा, अशी विधान नितेश राणे यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे असं विरोधी पक्षाने म्हटल्यावर वातावरण तापले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवशेनाला उपस्थित राहणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. ते विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांना योग्य वाटेल, तेव्हा योग्य वेळी ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी आज दिली.
नागपूरऐवजी मुंबईत हिवाळी अधिवेशन -
कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने सलग दुसर्या वर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. 22 डिसेंबरपासून म्हणजेच बुधवारपासून पाच दिवसांचे अधिवेशन सुरू झाले आहे. आज अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनात आघाडी सरकारला घेरण्यासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे आहेत.
हेही वाचा - रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार, हे खरंय का?