ETV Bharat / city

Sanjay Raut On Rally : 'हल्ल्याला प्रतिहल्ला करावा लागेल, आता महाराष्ट्रभर सभा'; शिवसेनेचा अॅक्शन मोडमध्ये

महाविकास आघाडी सरकारवर विशेषता शिवसेनेवर भाजपा आणि मनसेने जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपा आणि मनसे मोठ्या सभा घेऊन शिवसेनेच्या विरोधात जोरदार आघाडी उघडत असताना शिवसेनेनेही आता प्रति हल्ला करायचे ठरवले आहे. शिवसेना भवनात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी ( Shiv Sena leader Sanjay Raut criticized opposition ) दिली आहे.

Sanjay Raut On Rally
संजय राऊत
author img

By

Published : Apr 30, 2022, 2:30 PM IST

मुंबई - राज्यात सध्या भ्रष्टाचाराचा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून रान पेटले आहे. विरोधकांनी महाविकासआघाडीला विशेषता शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही सभांचे सत्र सुरू करून महाविकासआघाडीला आणि मुख्य म्हणजे शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. शिवसेनेच्या खासदार यांनी याबाबत नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवून विरोधकांच्या या प्रयत्नांना जोरदार उत्तर द्यायचा निर्णय घेण्यात ( Sanjay Raut criticized opposition on issue of Hindutva and rallies) आला आहे.

शिवसेनेची पहिली सभा बीकेसीत - विरोधकांच्या सभांना जोरदार उत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही आता भव्य सभा मुंबईतील बीकेसी येथील घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून येत्या १४ मे ला ही सभा होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली ( Sanjay Raut On Rally ) आहे. यासंदर्भात शिवसेना भवनात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेला प्रतिहल्ला करावाच लागेल शिवसेना गप्प बसणार नाही असा निर्धारच या बैठकीत करण्यात आला असून तसा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे.

विरोधकांनी हिंदुत्त्वावर बोलू नये - हिंदुत्त्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही, त्यांनी हिंदुत्त्वावर बोलू नये, विरोधकांचे हिंदुत्त्व हे बेगडी आणि तकलादू आहे असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. विरोधकांचे हिंदुत्व नकली असल्यामुळे त्यांना हिंदुत्त्ववादी बूस्टर डोस स्वतःला टोचून घ्यावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यांनाच नव्या हिंदुत्वाचा बूस्टर डोसची गरज आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचे मनोरंजन करून घ्यावे, असे ही राऊत यावेळी म्हणाले. किरीट सोमैया यांच्या टॉयलेट घोटाळ्याचा दुर्गंध किती आहे, हे आम्ही दाखवून देऊ असा इशाराही राऊत यांनी दिला.

आता महाराष्ट्रभर सभा - १४ मे रोजी मुंबईतील बीकेसी येथे शिवसेना पहिली भव्य सभा घेणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सभा घेण्यात येणार आहेत. दुसरी सभा मराठवाड्यात होणार आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या हल्ल्याला प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. महाराष्ट्रात आमचे सरकार आहे त्यामुळे आम्ही कायद्याचे पालन करूनच सभांचे नियोजन करू, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Ramadan Eid Special : 'लजिज कबाब'च्या जोडीला 'फेणी'ची लज्जत; मुंबईतील मोहम्मद अली मार्गावर भरली खाद्य जत्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.