ETV Bharat / city

Sanjay Raut On BJP : 'लक्षात ठेवा आमच्याकडे देखील सत्ता आहे'; संजय राऊत यांचा भाजपला इशारा - राज्यसभा निवडणूक

कोण कुणाची मते फोडणार? महाराष्ट्र घोडेबाजार होणार का? या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप होत आहे. तसेच भाजप अपक्ष मते फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रांचा वापर करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी 'लक्षात ठेवा आमच्याकडे देखील सत्ता आहे' असा थेट इशारा भाजपला दिला आहे. ( MP Sanjay Raut On BJP about Rajya Sabha Election 2022 )

Sanjay Raut On BJP
संजय राऊत यांचा भाजपला इशारा
author img

By

Published : Jun 4, 2022, 12:58 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात सध्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. कोण कुणाची मते फोडणार? महाराष्ट्र घोडेबाजार होणार का? या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप होत आहे. तसेच भाजप अपक्ष मते फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रांचा वापर करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी 'लक्षात ठेवा आमच्याकडे देखील सत्ता आहे' असा थेट इशारा भाजपला दिला आहे. ( MP Sanjay Raut On BJP about Rajya Sabha Election 2022 )

हेही वाचा - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोनावर अवलंबून -वडेट्टीवार

कोणी कुणाला रोखु शकत नाही - "राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळणारी व्यक्ती मॅच्युअर्ड असायलाच पाहिजे. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. आमचे काही प्रमुख लोक जाऊन आले आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. भाजपने ठरवले आहे की, त्यांनी निवडणूक लढायची तर निवडणूक लढायची म्हटल्यावर राजकारणात कोणी कोणाला रोखू शकत नाही. पण, जर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केला असेल तर अर्थात महाविकास आघाडी सुद्धा राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही देखील तेवढेच मजबुतीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेसाठीचा आहे. आता सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष, अपक्ष आणि इतर काही पक्षांवर अवलंबून आहे."

हेही वाचा - सरसंघचालकांनी पक्ष बदलला का? सुप्रिया सुळेंना पडला प्रश्न

लक्षात ठेवा आमच्याकडे देखील सत्ता आहे - "यासाठी कोणावर दबाव आणला जात आहे, याची माहिती आमच्याकडे रोज मिळते आहे. ते आमचे मित्र आहेत, ते सुद्धा आम्हाला सांगत आहेत, दबाव आणि काही जुनी प्रकरणे जी केंद्राच्या अखत्यारीत आहेत. ती उकरून काढून प्रेशर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चारही जागा महाविकास आघाडी अगदी व्यवस्थित जिंकणार आहे. भाजपने त्यांचे पैसे वाया घालवू नयेत. एखाद्या सामाजिक कार्यासाठी वापरावेत. अशी चटक लावू नये. ईडी, सीबीआय तुमच्या हातात आहेत. परंतु, इतर अनेक गोष्टी आमच्या हातात आहेत सरकार म्हणून. हे लक्षात घ्या." असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नेमका काय प्रतिसाद देतात हे थोड्याच वेळात माहिती होईल.

हेही वाचा - सरसंघचालकांच्या शिवलिंगाच्या भूमिकेवरुन शिवसेनेने टोचले भाजपचे कान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.