ETV Bharat / city

Deepali Sayed Criticized BJP : अंगावर आलात तर शिंगावर घेवू; दीपाली सय्यदचा भाजपाला पुन्हा इशारा - शिवसेना दीपाली सय्यद ट्विटवॉर

पंतप्रधानांवर भाष्य करत शिवसेना नेत्या दीपाली सय्यद ( Shiv Sena leader Deepali Sayed ) टीकाकारांना सडेतोड उत्तर देत आहेत. आताही अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर पंतप्रधानांच्या आठवण करून देऊ, असा थेट इशाराच सय्यद यांनी भाजपाला ( BJP ) दिला आहे.

Deepali Sayed Criticized BJP
Deepali Sayed Criticized BJP
author img

By

Published : May 31, 2022, 7:06 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जाते. पंतप्रधानांवर भाष्य करत शिवसेना नेत्या दीपाली सय्यद ( Shiv Sena leader Deepali Sayed ) टीकाकारांना सडेतोड उत्तर देत आहेत. आताही अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर पंतप्रधानांच्या आठवण करून देऊ, असा थेट इशाराच सय्यद यांनी भाजपाला ( BJP ) दिला आहे. आगामी काळात यामुळे सय्यद आणि भाजपा असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद आणि भाजपामध्ये ट्विटरवॉर रंगला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमैया, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खालच्या स्थरावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांना लक्ष केले होते. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी सय्यद यांना धमकावले. मात्र दीपाली सय्यद यांनी, अंगावर आला तर शिंगावर घेऊ आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर बोललात तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ, अशा शब्दांत ठणकावले आहे.

'महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून देऊ' : अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्यांवर बोलला तर पंतप्रधानांच्या आठवण करून देऊ, दिल्लीत हुजऱ्या करणाऱ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून देऊ, दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही, जय महाराष्ट्र! असे ट्विट करत दीपाली सय्यद यांनी भाजपाला पुन्हा एकदा ललकारले आहे.

'असा पंतप्रधान भारताने पाहिला नाही' : गेल्या काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी भाजपामध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो. किरीट सोमैयानी आरोप केल्यानंतर मंत्री, नेते बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कोणीच बोलत नाही, असा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल, असे आक्षेपार्ह ट्विट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केले होते. त्यानंतर भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी दीपाली सय्यद यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र दीपाली सय्यद यांनी पंतप्रधानवर केलेली टीका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Yuvasena Pune : 'विधवाबद्दल असभ्य भाषा करणाऱ्याला मानसिक उपचाराची गरज, अन्यथा अश्या मनोवृत्तीला युवतीसेना ठेचणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.