ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही - आदित्य ठाकरे - आमदारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायम स्वरुपी बंद झाले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह युवा नेते आदित्य ठाकरेही ( Aditya Thackeray ) मैदानात उतरले आहेत. बंडखोरांना पुन्हा विधानभवनाच्या पायरी चढू देणार नाही. शिवसेनेत फुटीरतावादी लोक नकोत. जे विकले गेले त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायम स्वरुपी बंद झाले. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीत समोरासमोर या, असे चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jun 26, 2022, 3:34 PM IST

मुंबई - बंड मोडण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह युवा नेते आदित्य ठाकरेही ( Aditya Thackeray ) मैदानात उतरले आहेत. बंडखोरांना पुन्हा विधानभवनाच्या पायरी चढू देणार नाही. शिवसेनेत फुटीरतावादी लोक नकोत. जे विकले गेले त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायम स्वरुपी बंद झाले. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीत समोरासमोर या, असे चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे. ते मुंबईत शक्ती प्रदर्शन दरम्यान बोलत होते.

दिलीप लांडे हातात हात घालून रडले होते. मात्र ते या बंडखोर गटासोबत कसे जाऊ शकतात? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मात्र, बंडखोर, गद्दारांना क्षमा नाही, असेही आदित्य ठाकरेंनी ठणकावले. अडीच वर्षे या सगळ्यांचे हिंदुत्व कुठे होते? हिंदुत्वातील 'ह' ही नव्हता, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे. 20 मे रोजी एकनाथ शिंदेंना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी टाळाटाळ केली होत, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : गरज पडल्यास शिवसैनिक दांडा हातात घेतील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.