ETV Bharat / city

Uddhav Thackeray : आताचे मुख्यमंत्री हे शिवसैनिक नाहीत, ते तर दगाबाज.. उद्धव ठाकरे गरजले.. - Uddhav Thackeray Criticized BJP

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला ( Uddhav Thackeray Criticized CM Eknath Shinde ) आहे. आत्ताचे मुख्यमंत्री हे शिवसैनिक नाहीत. ते तर दगाबाज आहेत. मर्द असाल तर स्वतःचा पक्ष काढा शिवसेना का चोरताय? असे म्हणत त्यांनी शिंदेंवर टीका केली आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jul 29, 2022, 3:47 PM IST

मुंबई- भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला संपवायचे आहे. मात्र ती संपत नाही म्हणून आता शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय आणि एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं सांगून हा संभ्रम भारतीय जनता पक्ष पसरवत ( Uddhav Thackeray Criticized BJP ) आहे. मात्र आताचे मुख्यमंत्री शिवसैनिक नाही, दगाबाज आहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ( Uddhav Thackeray Criticized CM Eknath Shinde ) लगावला.

मग २०१४ ला भाजपने युती का तोडली : बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हवा आहे, मात्र त्यांचा मुलगा नको. कारण मी बाळासाहेबांचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे. याला काहीजण घराणेशाही म्हणत आहेत. मात्र जे म्हणत आहेत त्यांना म्हणू द्या. मात्र आपण आपल्या घराण्याची परंपरा पुढे घेऊन जात आहोत. 2014 साली भारतीय जनता पक्षाने युती तोडली होती. त्यानंतरही लोकसभेत युती होती. आपल्या खांद्यावर पाय ठेवून यांनी दिल्ली गाठली. 2014ला मग भारतीय जनता पक्षाने युतीत का तोडली? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हा टोला लगावला आहे.

शिवसेना का चोरताय? : तसेच मर्द असाल तर स्वतःचा पक्ष काढा शिवसेना का चोरताय? आपल्या आई-वडिलांचे फोटो लावून मत मागायला सर्वसामान्य जनता आणि मतदारांकडे जा. माझ्या वडिलांचा फोटो लावू नका असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी बंडू कर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढला आहे. सातत्याने आपण बंडलकर आमदारांना आव्हान देत आहोत असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा : Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.