ETV Bharat / city

MAHA VIDHAN SABHA : भाजप-सेना युती, दोन्ही काँग्रेसची आघाडी.. 'वंचित' की 'मनसे' कुणाचे पारडे जड - विधानसभा निवडणूक २०१९

महाराष्ट्रात १४ व्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदतही आज संपणार आहे. निवडणुकीचे खरे चित्र आता स्पष्ट झाले असून प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरूवात होईल. आरोप-प्रत्यारोप व राजकीय शेरेबाजीने निवडणुकीला आता रंग चढणार आहे. दिवाळीपूर्वी नवीन विधानसभा व नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. १९६० मधील पहिल्या विधानसभेपासून या महिन्यात होत असलेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीपर्यंतचा राज्याच्या जडणघडणीचा प्रवासही अनेक वळणांनी झाला आहे. राज्याच्या एकंदर वाटचालीतील महत्वपूर्ण घटनांचा धांडोळा आपण घेणार आहोत ‘झरोका’ या १४ लेखांच्या विशेष लेखमालिकेतून.. यातील हा अंतिम १४ वा लेख.

झरोका
author img

By

Published : Oct 7, 2019, 5:14 AM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेसाठी २७ सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर व उमेदवारी मागे घेण्याची मुदत ७ ऑक्टोबर आहे. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच फेरीत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. ही निवडणूक बहुरंगी होत असून भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यामध्येच खरी लढत होत आहे. याबरोबरच वंचित बहुजन आघाडी, मनसे, एमआयएम आदि पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

लोकसभा निवडणुकापासून महाराष्ट्राच्या निवडणुकांचे वेध लागले होते. अखेर निवडणुका जाहीर झाल्या असून दिवाळीपूर्वी नवीन सरकार सत्तेवर येणार आहे. तसे पाहिले तर गेल्या एक-दोन महिन्यांपासूनच प्रचाराची लगबग सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रा, आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा तर काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेत राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

MAHA VIDHAN SABHA : आघाडीची सत्ता संपुष्टात.. युतीचे 'कमबॅक', लाखोंचे 'मराठा' मार्चे अन् भीमा-कोरेगाव दंगल

महाराष्ट्राची १४ वी विधानसभा निवडणूक -

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ नोंदणीकृत मतदारांची संख्या आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार असून यासाठी १ लाख ८० हजार ईव्हीएमचा व १ लाख ३९ हजार व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे.

महिला मतदारांची संख्या वाढली -

२८८ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी २९ तर जमातींसाठी २५ मतदारसंघ राखीव आहेत. राज्यात २०१४ निवडणुकीपासून महिला मतदारांची संख्या ३३ लाखाने वाढली आहे. राज्यात महिला मतदारांची संख्या ४ कोटी २७ लाख इतकी नोंदली गेली आहे. राज्यातील ८.९५ कोटी मतदारांपैकी महिला मतदारांची टक्केवारी ४८ टक्के आहे.

२०१४ मध्ये राज्यातील ८९३ असलेले स्त्री-पुरुष गुणोत्तर २०१९ मध्ये ९१४ इतके वाढले आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोंदिया जिल्ह्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. तर आदिवासी जिल्हा असणारा नंदुरबारमध्ये पुरुष मतदारांची संख्या महिलांपेक्षा केवळ ३६२ ने अधिक आहे. राज्यात तृथीयपंथीय मतदारांची संख्या २,०८६ इतकी नोंदली गेली आहे.
MAHA VIDHAN SABHA : आघाडीच्या विजयाची हॅट्रिक.. 'मनसे'चा धडाकेबाज प्रवेश अन् आदर्श व सिंचन घोटाळा

विधानसभा निवडणूक 2019 साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती 4 ऑक्टोबर होती. तर अर्जांच्या छाननीत राज्यभरात ४,७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता जवळपास सर्वच मतदारसंघांतील लढतींचं चित्र स्पष्ट झाले आहे.

24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या कौल कुणाच्या बाजूने जाईल याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या राजकीय पक्षाचे पारडे किती जड आहे, याचा घेतलेला आढवा.. राज्यातील सहा प्रमुख पक्ष - भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची सद्यस्थिती-

vidhan sabha election 2019
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

भाजपसमोरील आव्हाने व जमेच्या बाजू -

मे २०१९ मध्ये केंद्रात दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत आल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. मोदीच्या करिष्म्याने भाजपने ३०० हून अधिक जागा जिंकत २०१४ पेक्षाही दणदणीत विजय मिळवला आहे. याचा फायदा राज्यातही करून घेण्याची रणनिती भाजपने आखली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच मोदी-शहांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी महा-जनादेश यात्रा काढून केलेले काम जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४ च्या विधानसभेत मोदी लाटेतही भाजपला बहुमत मिळवता आले नव्हेत व त्यांचे घोडे 122 जागांवरच अडले होते. जागा वाटपाच्या वादामुळे त्यावेळा भाजप-सेनेची युती तुटली होती व त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला होता. ती चूक सुधारत यावेळी दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांची युती जाहीर करून उमेदवारही घोषित केले आहेत.

MAHA VIDHAN SABHA : मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला, नारायण राणेंचे बंड अन् राज ठाकरेंचा शिवसेनेला राम-राम
भाजपच्या जमेच्या बाजू -

  • केंद्रातील भाजप सरकारने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेत अनुच्छेद 370 हटवल्यानंतर देशासह राज्यात उत्साहाचं वातावरण. तरुणाईची मते भाजपच्या पारड्यात जातील असे राजकीय विश्लेषकांचे मत.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 23 खासदार निवडून आले. फक्त शहरी पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपने महानगर पालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांपर्यंत आपला विस्तार केला आहे. दोन्ही काँग्रेसचे अनेक प्रस्तापित नेते आपल्या गळाला लावले आहेत.
  • राज्यातील एकूण 27 महानगरपालिकांपैकी 14 महापालिकांमध्ये भाजपची स्वबळावर किंवा मित्रपक्षांसोबत सत्ता आहे. काँग्रेसची सत्ता सात ठिकाणी आहे. राष्ट्रवादी तीन ठिकाणी आहे तर एका ठिकाणी भाजपची चक्क काँग्रेससोबत आघाडी आहे. एक महानगर पालिका बहुजन विकास आघाडीकडे आहे. राज्यात एकूण नगरपालिका 171 आहेत. त्यापैकी 71 ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष आहे.
  • केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर गेल्या पाच वर्षात भाजप स्थानिक पातळीवर फोफावला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारांवर असणारा करिष्मा व अमित शाह यांची रणनीती, या दोन भाजपला अन्य पक्षाच्या तुलनेत वरचढ ठरवतात.
  • ज्या बालाकोट एअर स्ट्राईकचा लोकसभेत फायदा मिळाला त्याचा व्हिव्हिओ वायू दलाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. याचा फायदा महाराष्ट्र विधानसभेत भाजपा अँड कंपनीला मिळू शकतो.
  • -भाजपकडून पाच आजी-माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर 14 विद्यमान आमदारांची उमेदवारी कापण्यात आली आहे. भाजपने यावेळी थेट मंत्री आणि आमदारांच्या उमेदवाऱ्या कापण्याची हिंमत दाखवली आहे. सध्या महाराष्ट्र भाजपची सूत्रं पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या जोडगोळीकडे आहेत.

भाजपसमोरील आव्हाने

  • सरकारची पीकवीमा आणि कर्जमाफी योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित राहिल्याचा आरोप सत्तेत भागीदार शिवसेनेनेच केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो.
  • भाजपला आर्थिक मंदीचा सामना नीट करता आला नाही व सरकारच्या धोरणामुळेच मंदी आल्याचा आरोप माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. वाहन उद्योगात लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात जवळपास लहान-मोठ्या दीड लाख कंपन्या व उद्योग बंद पडल्याचे वृत्त आहे. अनेक मोठ्या शहरांना मंदीचा फटका बसला आहे.
  • -मंदीबरोबरच गेल्या पाच वर्षात भाजप सरकारला नवीन नोकऱ्या निर्माण करण्यात अपयश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकसभेवेळी ७२ हजार जागांची महाभरती घोषित केली होती. परंतु सरकारकडून अजूनही त्याची जाहिरात काढण्यात आलेली नाही. यामुळे बेरोजगार तरुणांचा कौल भाजपच्या विरोधात जाऊ शकतो.
  • अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व अन्य घोषणा थंड्या बासनात पडून आहेत.
  • राज्यात पूर आणि दुष्काळाचं संकट एकाच वेळी अनुभवयाला मिळाले. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्याती परिस्थितीत गंभीर बनली होती. त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यस्त होते,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांच्या रोषाचा सामना काराव लागला होता.
  • भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आघाडीतील नेत्यांना पक्षात सामावून घेतले. त्यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आमच्याकडे वॉशिंगमशीन आणि गुजरातचं निरमा पावडर आहे. तेव्हा येणाऱ्या माणसाला आम्ही स्वच्छ करून आमच्यात घेतो असं वादगग्रस्त वक्तव्य केले होते.
  • आयात नेत्यांमुळे पक्षाच्या निष्ठावंतामध्ये नाराजी आहे. भूखंड प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतर पुन्हा मंत्रिपदाची आशा असलेल्या एकनाथ खडसेंना विजनवासात पाठवले आहे. त्यांच्याबरोबरच विनोद तावडे, बावनकुळे, प्रकाश मेहता व राज पुरोहित या जनाधार असलेल्या नेत्यांना पक्षाने आमदारकीचे तिकीट नाकारून त्यांच्या समर्थकांची नाराजी ओढवून घेतली आहे.
    vidhan sabha election 2019
    आदित्य ठाकरेंची जन आशीर्वीद यात्रा

शिवसेना -

केंद्रात आणि राज्यात सत्तेत वाटा घेऊनही शिवसेनेने विरोधकाची भूमिका चांगल्या तऱ्हेने बजावली आहे. कमकूवत आघाडीमुळे सेनेचे विरोधीपक्षाची स्पेस व्यापून टाकली आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे 63 आमदार निवडून गेले होते. यावेळीही शिवसेना हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रबल पक्ष आहे.

MAHA VIDHAN SABHA : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली निवडणूक.. मुद्रांक घोटाळा अन् पहिला दलित मुख्यमंत्री

शिवसेनेची शक्तीस्थाने बलस्थानं -

  • सरकारच्या विरोधात वेळोवेळी नाराजी व्यक्त करून शिवसेनेने वादगस्त मुद्यांबाबत भाजपबरोबर अंतर ठेवलं आहे. नोटाबंदी, पीकविमा, कर्जमाफी असे मुद्दे ज्यावर जनता नाराज आहे, त्याबद्दल सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
  • राज्यातील मराठा समाजाची मते मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आहेत. त्यांच्याकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची जबरदस्त फळी आहे.
  • आदित्य ठाकरेच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे लोकांशा चांगला संवाद झाला आहे.

शिवसेनेसमोरील आव्हाने -

  • ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा निवडणूक लढवणारे म्हणून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे उमेदवारी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी टीकेचे धनी झाले आहेत. त्याला निमित्त ठरलं ते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात लावलेले बॅनर्स.
  • आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ वरळीत लागलेल्या 'केम छो वरली' अशा गुजराती भाषेतील बॅनर्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. फक्त गुजरातीच नव्हे तर मराठीव्यतिरिक्त इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूतील बॅनर्ससुद्धा लावण्यात आले आहे.
  • शिवसेनेमध्येही मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्यामुळे पक्षातील काही नेते नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरी होण्याची भीतीही पक्षापुढे आहे.
  • राज्यातील दुष्काळ, शेतीमाल, कांदा दर आदिबाबत न बोलता हिंदुत्व व राममंदिरचा मुद्दा प्रचारात आणणे शिवसेनेसाठी कळीचा ठरू शकतो
  • मात्र एकेकाळी मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेने आधी हिंदी आणि गुजरातीसह इतर भाषांमधून प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
    vidhan sabha election 2019
    सौ.सोशल मीडिया

काँग्रेसची अवस्था-

स्वातंत्र्य चळवळीपासून मोठी राजकीय परंपरा असलेला काँग्रेस सध्या निर्णायकी अवस्थेत आहे. २०१४ पाठोपाठ २०१९ मध्येही दारुण परभवानंतर पक्षातील अवसानच गळाले आहे. गेल्या विधानसभेत काँग्रेसचे 42 आमदार निवडून गेले होते. यावेळी तेवढे उमेदवार जिंकून आणणेही काँग्रेससाठी मुश्किल झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडल्यापासून पक्षाला गळती लागली असून ती थांबविण्याचा प्रयत्न अजून तरी केंद्रीय नेतृत्वाकडून झालेला नाही. 2019 मध्ये लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. अनेक दिवस काँग्रेसला पर्यायी अध्यक्ष मिळत नव्हता. शेवटी सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष बनल्या.

MAHA VIDHAN SABHA : महाराष्ट्रात सत्तांतर व शिवसेना-भाजप युतीची सत्ता.. राज्यात पहिल्यांदाच ब्राम्हण मुख्यमंत्री

काँग्रेसची बलस्थानं -

  • सोनिया गांधींच्या हाती काँग्रेसची कमान आल्यानंतर त्यांनी आर्थिक मंदी, बेरोजगारी, कमी गुंतवणूकद आदि मुद्दे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला व हिंदुत्व, कलम 370, राम मंदिर अशा धार्मिक व भावनिक मुद्द्यांपासून दूर राहण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
  • गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते पण यावेळी मात्र ते एकत्र लढत आहेत. दोन्ही पक्षांनी 125-125 जागा वाटून घेतल्या आणि उरलेल्या 48 जागा मित्रपक्षांसाठी ठेवल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत याचाही फायदा आघाडीला होऊ शकतो.
  • या निवडणुकीत भाजपच्या विरोधातही काही मुद्दे आहेत. त्याचा फायदा उचलला तर अँडी इन्कम्बन्सीचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो.
  • -महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपकडून काश्मीरचा मुद्दा प्रचारात आणला जात आहे. याचे बुमरँगही होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसची बलस्थाने व आव्हाने -

  • पक्ष स्थापनेपासून राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीला वाईट दिवस आले आहेत. भाजप व शिवसेनेमध्ये सर्वाधक नेते राष्ट्रवादीमधून गेले आहेत. 2014 मध्ये 41 जागा मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण मदार शरद पवारांच्या नेतृत्वावर आहे.
    vidhan sabha election 2019
    पवारांचा निवडणूक दौरा
  • गेल्या वेळी सत्तास्थापनेसाठी भाजला 23 जागा कमी पडत होत्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. यावेळीही अशी एखादी पवार खेळी होऊ शकते.
  • शरद पवारांचे नेतृत्व व त्यांचे राज्यव्यापी दौरे ही राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पवारांनी ७८ व्या वर्षी ७५ ते ८० जाहीर सभा घेतल्या होत्या. अजूनही त्यांचा उत्साह कायम आहे.
  • राष्ट्रवादीची कुमकुवत दूवाही पवारच आहेत, कारण त्यांच्याशिवाय सभा गाजवणारा एकही नेता राष्ट्रवादीकडे नाही. अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, अजित पवार व राहित पवार यांची थोडीबहूत साथ त्यांना मिळू शकते.
  • विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊनही दोन्ही पक्षांनी पंढरपूरमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांना तर काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिलीय.
    vidhan sabha election 2019
    सौ. सोशल मीडिया

प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी -

  • लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली ताकद दाखवून दिली होती. एकूण सात मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहून वंचितचे उमेदवार पराभूत झाले होते. अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवून वंचितचे खाते उघडले होते.
  • वंचित आघाडीमुळे सात ते आठ जागांवर नुकसान सोसावं लागल्याचे काँग्रेसने मान्य केले होते. काही जणांनी त्यांच्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून पाहिलं तर काही जणांनी त्यांना भाजपची बी टीम म्हणूनही टीका केली.
  • विधानसभेलाही काँग्रसेची आघाडीची ऑफर आंबेडकरांनी धुडकाऊन २८८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
  • यावेळी वंचितमधून एमआयएम बाहेर पडल्यामुळे व गोपीचंद पडळकरांसारखा नेता भाजपच्या गळाला लागल्यामुळे वंचितची ताकद कमी झाली आहे. बहुजन जनता त्यांना कसा प्रतिसाद देते हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.
  • प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेवेळी आणि आताही अनेक शहरांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
  • बहुजन समाजातील वेगवेगळ्या जातींच्या लोकांना तिकीट देऊन त्यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्मुला राबवला आहे. उमेदवार यादीत उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जातही नमूद केली आहे.
  • लोकसभा निवडणुकीत मतदारांचा अंदाज आल्याने विधानसभेत त्यांच्या मतांची टक्केवारी वाढू शकते, असे ज्येष्ठ पत्रकार सांगतात.
  • लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रभर सभा घेतल्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसला आणि एका वेगळ्या प्रकारचं ध्रुवीकरण झालं होतं. बहुजन समाजातील घटक-अल्पसंख्याक समाज असे एकत्र येताना दिसले मात्र आता औवेसी सारखा नेता व फर्डा वक्ता वंचितने गमावला आहे.
    vidhan sabha election 2019
    राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • लोकसभा निवडणुवेळी 'लाव रे तो व्हीडिओ' ने खळबळ माजवणाऱ्या राज ठाकरेंना विधानसभेत उमेदवार उतरवले आहेत. 2009च्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरे यांनी 13 आमदार निवडून आणले होते. त्यांनी पुनरावृत्ती त्यांना मागील दोन निवडणुकीत करता आली नाही.
  • राज ठाकरे यांची मनसे म्हणजे 'वन मॅन आर्मी शो' आहे असंच म्हटलं जातं. राज ठाकरे यांचं वकृत्व त्यांची शैली, फटकारे या सर्व गोष्टींमुळे ते जनतेचं लक्ष वेधून ठेवतात. सभांची चर्चा घडवून आणतात. तरुणांना आकर्षित करण्याची क्षमता राज्यात केवळ राज ठाकरेंकडे आहे.
  • ईडीच्या चौकशीनंतर गप्प झालेल्या राज ठाकरे जाहीर सभांमधून काय बोलतात याकडे साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.
  • असंही म्हटलं जातं की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते पण त्यांना लोक त्यांना मतं देत नाहीत. सभांना तरुणांची गर्दी होते मात्र अनेक तरुणांचे मतदान गावाकडे असते व मनसेचे उमेदवार शहरी मतदारसंघात असतात.
  • मनसेमध्ये राज ठाकरेंनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेतृत्व नाही. स्थानिक पातळीवर कार्यकत्यांनी फळी नाही.

Intro:Body:

MAHA VIDHAN SABHA :  भाजप-सेना युती, दोन्ही काँग्रेसची आघाडी.. 'वंचित' की 'मनसे' कुणाचे पारडे जड

महाराष्ट्रात १४ व्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज माघारी  घेण्याची मुदतही आज संपणार आहे. निवडणुकीचे खरे चित्र आता स्पष्ट झाले असून प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरूवात होईल.  आरोप-प्रत्यारोप व राजकीय शेरेबाजीने निवडणुकीला आता रंग चढणार आहे. दिवाळीपूर्वी नवीन विधानसभा व नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. १९६० मधील पहिल्या विधानसभेपासून या महिन्यात होत असलेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीपर्यंतचा राज्याच्या जडणघडणीचा प्रवासही अनेक वळणांनी झाला आहे. राज्याच्या एकंदर वाटचालीतील महत्वपूर्ण घटनांचा धांडोळा आपण घेणार आहोत ‘झरोका’ या १४ लेखांच्या विशेष लेखमालिकेतून.. यातील हा अंतिम १४ वा लेख.

मुंबई - महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेसाठी २७ सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर व उमेदवारी मागे घेण्याची मुदत ७ ऑक्टोबर आहे.  २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच फेरीत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. ही निवडणूक बहुरंगी होत असून भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यामध्येच खरी लढत होत आहे. याबरोबरच वंचित बहुजन आघाडी, मनसे, एमआयएम आदि पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

लोकसभा निवडणुकापासून महाराष्ट्राच्या निवडणुकांचे वेध लागले होते. अखेर निवडणुका जाहीर झाल्या असून दिवाळीपूर्वी नवीन सरकार सत्तेवर येणार आहे. तसे पाहिले तर गेल्या एक-दोन महिन्यांपासूनच प्रचाराची लगबग सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रा, आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा तर काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेत राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  

महाराष्ट्राची १४ वी विधानसभा निवडणूक -

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ नोंदणीकृत मतदारांची संख्या आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार असून यासाठी १ लाख ८० हजार ईव्हीएमचा व १ लाख ३९ हजार व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे.  

महिला मतदारांची संख्या वाढली -

२८८ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी २९ तर जमातींसाठी २५ मतदारसंघ राखीव आहेत. राज्यात २०१४ निवडणुकीपासून महिला मतदारांची संख्या ३३ लाखाने वाढली आहे. राज्यात महिला मतदारांची संख्या ४ कोटी २७ लाख इतकी नोंदली गेली आहे. राज्यातील ८.९५ कोटी मतदारांपैकी महिला मतदारांची टक्केवारी ४८ टक्के आहे.

२०१४ मध्ये राज्यातील ८९३ असलेले स्त्री-पुरुष गुणोत्तर २०१९ मध्ये ९१४ इतके वाढले आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोंदिया जिल्ह्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. तर आदिवासी जिल्हा असणारा नंदुरबारमध्ये पुरुष मतदारांची संख्या महिलांपेक्षा केवळ ३६२ ने अधिक आहे. राज्यात तृथीयपंथीय मतदारांची संख्या २,०८६ इतकी नोंदली गेली आहे.

विधानसभा निवडणूक 2019 साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती 4 ऑक्टोबर होती. तर अर्जांच्या छाननीत राज्यभरात ४,७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता जवळपास सर्वच मतदारसंघांतील लढतींचं चित्र स्पष्ट झाले आहे.

24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या कौल कुणाच्या बाजूने जाईल याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या राजकीय पक्षाचे पारडे किती जड आहे, याचा घेतलेला आढवा.. राज्यातील सहा प्रमुख पक्ष - भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची सद्यस्थिती-

भाजपसमोरील आव्हाने व जमेच्या बाजू -

मे २०१९ मध्ये  केंद्रात दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत आल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. मोदीच्या करिष्म्याने भाजपने ३०० हून अधिक जागा जिंकत २०१४ पेक्षाही दणदणीत विजय मिळवला आहे. याचा फायदा राज्यातही करून घेण्याची रणनिती भाजपने आखली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच मोदी-शहांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी महा-जनादेश यात्रा काढून केलेले काम जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४ च्या विधानसभेत मोदी लाटेतही भाजपला बहुमत मिळवता आले नव्हेत व त्यांचे घोडे 122 जागांवरच अडले होते. जागा वाटपाच्या वादामुळे त्यावेळा भाजप-सेनेची युती तुटली होती व त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला होता. ती चूक सुधारत यावेळी दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांची युती जाहीर करून उमेदवारही घोषित केले आहेत.

भाजपच्या जमेच्या बाजू -

- केंद्रातील भाजप सरकारने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेत अनुच्छेद 370 हटवल्यानंतर देशासह राज्यात उत्साहाचं वातावरण. तरुणाईची मते भाजपच्या पारड्यात जातील असे राजकीय विश्लेषकांचे मत.

- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 23 खासदार निवडून आले. फक्त शहरी पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपने महानगर पालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांपर्यंत आपला विस्तार केला आहे. दोन्ही काँग्रेसचे अनेक प्रस्तापित नेते आपल्या गळाला लावले आहेत.

-राज्यातील  एकूण 27 महानगरपालिकांपैकी 14 महापालिकांमध्ये भाजपची स्वबळावर किंवा मित्रपक्षांसोबत सत्ता आहे. काँग्रेसची सत्ता सात ठिकाणी आहे. राष्ट्रवादी तीन ठिकाणी आहे तर एका ठिकाणी भाजपची चक्क काँग्रेससोबत आघाडी आहे. एक महानगर पालिका बहुजन विकास आघाडीकडे आहे. राज्यात एकूण नगरपालिका 171 आहेत. त्यापैकी 71 ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष आहे.

- केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर गेल्या पाच वर्षात भाजप स्थानिक पातळीवर फोफावला आहे.

 -पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारांवर असणारा करिष्मा व अमित शाह यांची रणनीती, या दोन भाजपला अन्य पक्षाच्या तुलनेत वरचढ ठरवतात.

- ज्या बालाकोट एअर स्ट्राईकचा लोकसभेत फायदा मिळाला त्याचा व्हिव्हिओ वायू दलाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. याचा फायदा महाराष्ट्र विधानसभेत भाजपा अँड कंपनीला मिळू शकतो.

 - भाजपकडून पाच आजी-माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर 14 विद्यमान आमदारांची उमेदवारी कापण्यात आली आहे. भाजपने यावेळी थेट मंत्री आणि आमदारांच्या उमेदवाऱ्या कापण्याची हिंमत दाखवली आहे. सध्या महाराष्ट्र भाजपची सूत्रं पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या जोडगोळीकडे आहेत.

भाजपसमोरील आव्हाने

- सरकारची पीकवीमा आणि कर्जमाफी योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित राहिल्याचा आरोप सत्तेत भागीदार शिवसेनेनेच केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो.

- भाजपला आर्थिक मंदीचा सामना नीट करता आला नाही व सरकारच्या धोरणामुळेच मंदी आल्याचा आरोप माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. वाहन उद्योगात लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात जवळपास लहान-मोठ्या  दीड लाख कंपन्या व उद्योग बंद पडल्याचे वृत्त आहे. अनेक मोठ्या शहरांना मंदीचा फटका बसला आहे.

- मंदीबरोबरच गेल्या पाच वर्षात भाजप सरकारला नवीन नोकऱ्या निर्माण करण्यात अपयश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकसभेवेळी ७२ हजार जागांची महाभरती घोषित केली होती. परंतु सरकारकडून अजूनही त्याची जाहिरात काढण्यात आलेली नाही. यामुळे बेरोजगार तरुणांचा कौल भाजपच्या विरोधात जाऊ शकतो.

- अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व अन्य घोषणा थंड्या बासनात पडून आहेत.

- राज्यात पूर आणि दुष्काळाचं संकट एकाच वेळी अनुभवयाला मिळाले. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्याती परिस्थितीत गंभीर बनली होती. त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यस्त होते,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांच्या रोषाचा सामना काराव लागला होता.

- भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आघाडीतील नेत्यांना पक्षात सामावून घेतले. त्यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आमच्याकडे वॉशिंगमशीन आणि गुजरातचं निरमा पावडर आहे. तेव्हा येणाऱ्या माणसाला आम्ही स्वच्छ करून आमच्यात घेतो असं वादगग्रस्त वक्तव्य केले होते.

- आयात नेत्यांमुळे पक्षाच्या निष्ठावंतामध्ये नाराजी आहे. भूखंड प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतर पुन्हा मंत्रिपदाची आशा असलेल्या एकनाथ खडसेंना विजनवासात पाठवले आहे. त्यांच्याबरोबरच विनोद तावडे, बावनकुळे, प्रकाश मेहता व राज पुरोहित या जनाधार असलेल्या नेत्यांना  पक्षाने आमदारकीचे तिकीट नाकारून त्यांच्या समर्थकांची नाराजी ओढवून घेतली आहे.

शिवसेना -

केंद्रात आणि राज्यात सत्तेत वाटा घेऊनही शिवसेनेने विरोधकाची भूमिका चांगल्या तऱ्हेने बजावली आहे. कमकूवत आघाडीमुळे सेनेचे विरोधीपक्षाची स्पेस व्यापून टाकली आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे 63 आमदार निवडून गेले होते. यावेळीही शिवसेना हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रबल पक्ष आहे.

शिवसेनेची शक्तीस्थाने बलस्थानं -

सरकारच्या विरोधात वेळोवेळी नाराजी व्यक्त करून शिवसेनेने वादगस्त मुद्यांबाबत भाजपबरोबर अंतर ठेवलं आहे. नोटाबंदी, पीकविमा, कर्जमाफी असे मुद्दे ज्यावर जनता नाराज आहे, त्याबद्दल सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

-राज्यातील मराठा समाजाची मते मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आहेत. त्यांच्याकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची जबरदस्त फळी आहे.

- आदित्य ठाकरेच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे लोकांशा चांगला संवाद झाला आहे.

शिवसेनेसमोरील आव्हाने -

- ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा निवडणूक लढवणारे म्हणून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे उमेदवारी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी टीकेचे धनी झाले आहेत. त्याला निमित्त ठरलं ते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात लावलेले बॅनर्स.

- आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ वरळीत लागलेल्या 'केम छो वरली' अशा गुजराती भाषेतील बॅनर्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. फक्त गुजरातीच नव्हे तर मराठीव्यतिरिक्त इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूतील बॅनर्ससुद्धा लावण्यात आले आहे.

- शिवसेनेमध्येही मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्यामुळे पक्षातील काही नेते नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरी होण्याची भीतीही पक्षापुढे आहे.

- राज्यातील दुष्काळ, शेतीमाल, कांदा दर आदिबाबत न बोलता हिंदुत्व व राममंदिरचा मुद्दा प्रचारात आणणे शिवसेनेसाठी कळीचा ठरू शकतो

काँग्रेस -

स्वातंत्र्य चळवळीपासून मोठी राजकीय परंपरा असलेला काँग्रेस सध्या निर्णायकी अवस्थेत आहे. २०१४ पाठोपाठ २०१९ मध्येही दारुण परभवानंतर पक्षातील अवसानच गळाले आहे. गेल्या विधानसभेत काँग्रेसचे 42 आमदार निवडून गेले होते. यावेळी तेवढे उमेदवार जिंकून आणणेही काँग्रेससाठी मुश्किल झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडल्यापासून पक्षाला गळती लागली असून ती थांबविण्याचा प्रयत्न अजून तरी केंद्रीय नेतृत्वाकडून झालेला नाही. 2019 मध्ये लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. अनेक दिवस काँग्रेसला पर्यायी अध्यक्ष मिळत नव्हता. शेवटी सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष बनल्या.

काँग्रेसची बलस्थानं

 -सोनिया गांधींच्या हाती काँग्रेसची कमान आल्यानंतर त्यांनी आर्थिक मंदी, बेरोजगारी, कमी  गुंतवणूकद आदि मुद्दे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला व  हिंदुत्व, कलम 370, राम मंदिर अशा धार्मिक व भावनिक मुद्द्यांपासून दूर राहण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

- गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते पण यावेळी मात्र ते एकत्र लढत आहेत. दोन्ही पक्षांनी 125-125 जागा वाटून घेतल्या आणि उरलेल्या 48 जागा मित्रपक्षांसाठी ठेवल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत याचाही फायदा आघाडीला होऊ शकतो.

- या निवडणुकीत भाजपच्या विरोधातही काही मुद्दे आहेत. त्याचा फायदा उचलला तर अँडी इन्कम्बन्सीचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो.

 - महाराष्ट्राच्या  निवडणुकीत भाजपकडून काश्मीरचा मुद्दा प्रचारात आणला जात आहे. याचे बुमरँगही होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसची बलस्थाने व आव्हाने -

- पक्ष स्थापनेपासून राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीला वाईट दिवस आले आहेत. भाजप व शिवसेनेमध्ये सर्वाधक नेते राष्ट्रवादीमधून गेले आहेत. 2014 मध्ये 41 जागा मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण मदार शरद पवारांच्या नेतृत्वार आहे.

 - गेल्या वेळी सत्तास्थापनेसाठी भाजला 23 जागा कमी पडत होत्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. यावेळीही अशी एखादी पवार खेळी होऊ शकते.

- शरद पवारांचे नेतृत्व व त्यांचे राज्यव्यापी दौरे ही राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पवारांनी ७८ व्या वर्षी ७५ ते ८० जाहीर सभा घेतल्या होत्या. अजूनही त्यांचा उत्साह कायम आहे.

- राष्ट्रवादीची कुमकुवत दूवाही पवारच आहेत, कारण त्यांच्याशिवाय सभा गाजवणारा एकही नेता राष्ट्रवादीकडे नाही. अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, अजित पवार व राहित पवार यांची थोडीबहूत साथ त्यांना मिळू शकते.  

प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी -

- लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली ताकद दाखवून दिली होती. एकूण सात मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहून वंचितचे उमेदवार पराभूत झाले होते. अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवून वंचितचे खाते उघडले होते.  

- वंचित आघाडीमुळे सात ते आठ जागांवर नुकसान सोसावं लागल्याचे काँग्रेसने मान्य केले होते.  काही जणांनी त्यांच्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून पाहिलं तर काही जणांनी त्यांना भाजपची बी टीम म्हणूनही टीका केली.

- विधानसभेलाही काँग्रसेची आघाडीची ऑफर आंबेडकरांनी धुडकाऊन २८८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

- यावेळी वंचितमधून एमआयएम बाहेर पडल्यामुळे व गोपीचंद पडळकरांसारखा नेता भाजपच्या गळाला लागल्यामुळे वंचितची ताकद कमी झाली आहे. बहुजन जनता त्यांना कसा प्रतिसाद देते हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.  

- प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेवेळी आणि आताही अनेक शहरांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

-बहुजन समाजातील वेगवेगळ्या जातींच्या लोकांना तिकीट देऊन त्यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्मुला राबवला आहे. उमेदवार यादीत उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जातही नमूद केली आहे.

- लोकसभा निवडणुकीत मतदारांचा अंदाज आल्याने विधानसभेत त्यांच्या मतांची टक्केवारी वाढू शकते, असे ज्येष्ठ पत्रकार सांगतात.

- लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रभर सभा घेतल्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसला आणि एका वेगळ्या प्रकारचं ध्रुवीकरण झालं होतं. बहुजन समाजातील घटक-अल्पसंख्याक समाज असे एकत्र येताना दिसले मात्र आता औवेसी सारखा नेता व फर्डा वक्ता वंचितने गमावला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

- लोकसभा निवडणुवेळी 'लाव रे तो व्हीडिओ' ने खळबळ माजवणाऱ्या राज ठाकरेंना विधानसभेत उमेदवार उतरवले आहेत. 2009च्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरे यांनी 13 आमदार निवडून आणले होते. त्यांनी पुनरावृत्ती त्यांना मागील दोन निवडणुकीत करता आली नाही.

- राज ठाकरे यांची मनसे म्हणजे 'वन मॅन आर्मी शो' आहे असंच म्हटलं जातं. राज ठाकरे यांचं वकृत्व त्यांची शैली, फटकारे या सर्व गोष्टींमुळे ते जनतेचं लक्ष वेधून ठेवतात. सभांची चर्चा घडवून आणतात. तरुणांना आकर्षित करण्याची क्षमता राज्यात केवळ राज ठाकरेंकडे आहे.

- ईडीच्या चौकशीनंतर गप्प झालेल्या राज ठाकरे जाहीर सभांमधून काय बोलतात याकडे साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

- असंही म्हटलं जातं की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते पण त्यांना लोक त्यांना मतं देत नाहीत. सभांना तरुणांची गर्दी होते मात्र अनेक तरुणांचे मतदान गावाकडे असते व मनसेचे उमेदवार शहरी मतदारसंघात असतात.

- मनसेमध्ये राज ठाकरेंनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेतृत्व नाही. स्थानिक पातळीवर कार्यकत्यांनी फळी नाही.

मात्र एकेकाळी मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेने आधी हिंदी आणि गुजरातीसह इतर भाषांमधून प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊनही दोन्ही पक्षांनी पंढरपूरमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांना तर काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिलीय.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.