मुंबई - केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेल्या "संकल्प से सिद्धी" या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ), केंद्रीय संस्कृती राज्य मंत्री मीनाक्षी लेखी व सीआयआयचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन सरकारला शुभेच्छा देण्याबरोबरच शिंदे- फडणवीस सरकारला, "हमने ऐसा अमृत पिलाया है की उनकी गाडी कभी रूक नही पाएगी." असे सांगितल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर होत असताना, एकनाथ शिंदे बंडखोर गटाची ( Eknath Shinde Group ) माहिती गडकरी यांना माहीत होती का असा संशय निर्माण झाला आहे?
महाराष्ट्र, मुंबईचे योगदान मोठे? - या कार्यक्रमांमध्ये बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्राच्या नवीन सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही तुम्हाला असे अमृत दिलं आहे की तुम्हाला अमरत्व प्राप्त झाले आहे. या सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. देशाच उद्दिष्ट पाच ट्रिलियन इकोनॉमी बनवायचं आहे. हे करत असताना मुंबई त्याच बरोबर महाराष्ट्राचा सहयोग लाभला नाही, तर हे उद्दिष्ट शक्यच होणार नाही, असेही गडकरी म्हणाले. विशेष करून महाराष्ट्राचे योगदान सर्व शस्त्रात जास्त राहिलेले आहे. कृषी क्षेत्रात ते १२ टक्के असून ते २० टक्के पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
केंद्राच्या प्रकल्पास महाराष्ट्राचेही सहकार्य हवे? - वास्तविक एमएसआरडीसी यांचा फाउंडर मी असल्याचे गडकरींनी याप्रसंगी सांगितल. वरळी- बांद्रा सिलिंक असेल, महाराष्ट्रातील ५५ फ्लाय ओवर असतील, मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे हा एमएसआरडीसी ने १६५० कोटी ला बांधला. तर ५५ फ्लाय ओवर बनण्यासाठी २ हजार करोड खर्च येणार होत. पण हे फ्लावर आम्ही ९५० करोड रुपयांमध्ये बांधले असेही गडकरी यांनी याप्रसंगी सांगितले. राज्यातील समृद्धी महामार्ग हा सर्वात उत्कृष्ट असा प्रकल्प असून महाराष्ट्राच्या इतिहासाला समृद्धी देणारा असा हा प्रकल्प असल्याचं गडकरींनी याप्रसंगी सांगितल. दिल्ली- मुंबई हायवे डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल. त्याचबरोबर नरिमन पॉईंट ते दिल्ली हे अंतर १२ तासात पूर्ण करण्याचे उद्दिष्टही असल्याचे ते म्हणाल. वरळी- बांद्रा सिलिंक हा प्रकल्प वसई विरार पर्यंत न्यायचा त्यांचा मानस होता. परंतु काही त्यामध्ये अडचणी आल्या, यासाठी ५० हजार कारोडचा डीपीआर सुद्धा तयार केला असून जर महाराष्ट्र सरकारने स्टील व सिमेंटवर लागणार जीएसटी माफ करावा अशी विनंती ही त्यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे. मुंबई ते बेंगलोर हे अंतर साडेचार तासात ताशी १३० ते १३५ किलोमीटरने तर मुंबई-औरंगाबाद अंतर दोन तासात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या दोन्ही प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र सरकारने जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली तर बरे होईल असेही गडकरी यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातून पेट्रोल हद्दपार करा? - राज्यात सध्या पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीवरून रणकंदन सुरू असताना महाराष्ट्रातून पेट्रोल हद्दपार करा असं खुद्द नितीन गडकरी यांनी सांगितल आहे. ग्रीन हायड्रोजन इंधन भविष्यासाठी महत्त्वाचे असून त्याबाबत पावल उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. विशेष करून पेट्रोल ऐवजी इथेनॉलचा वापर करण्याचेही त्यांनी सुचवले आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर १२० रुपये प्रति लिटर आहे तर इथेनॉल ६२ रुपयांनी दिले जात असल्याकारणाने ५९ टक्के किमतीमध्ये फरक पडत असून ऍव्हरेजही तेवढाच राहत आहे. म्हणून महाराष्ट्रातून पेट्रोलच हद्दपार करा असं नितीन गडकरी यांनी सुचवल आहे.
सिंचनाला प्रथम प्राधान्य द्या! - आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी सिंचनाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगून, वाहणारे पाणी थांबवून गोदावरीमध्ये आणा असं गडकरी यांनी नवीन सरकारला सांगितले आहे. आपल्याकडे सर्वात जास्त युवा टॅलेंट असल्याकारणाने भारत देश नक्कीच आत्मनिर्भर होण्याच्या दिशेकडे वाटचाल करेल. मोदी सरकारने ८ वर्षात सर्व क्षेत्रांमध्ये काम केले आहे. याच्या अगोदर काय झाले त्यावर चर्चा नको असे सांगत परिस्थितीनुसार बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
Nitin Gadkari On Shinde Fadnavis Government: "ऐसा अमृत पिलाया है कि, शिंदे-फडणवीस गाडी कभी रुकेगी" - नितीन गडकरी - एकनाथ शिंदे गट
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण झाला आहे. "हमने ऐसा अमृत पिलाया है की उनकी गाडी कभी रूक नही पाएगी." असे नितीन गडकरी यांनी म्हटल्यामुळे ( Nitin Gadkari Statement ) एकनाथ शिंदे बंडखोर गटाची ( Eknath Shinde Group ) माहिती गडकरी यांना होती का असा संशय निर्माण झाला आहे?