ETV Bharat / city

'महाविकास आघाडी सरकार नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे'

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कितीही संकटे आली तरी नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

sharad pawar
शरद पवार
author img

By

Published : Nov 24, 2020, 7:17 PM IST

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकार कितीही संकटे आली तरी नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. बीडचे माजी खासदार आणि भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी बोलताना देशात सत्ता नसताना राज्यात सरकार चालवणे सोपे नसते. देशभरात वेगळे राजकीय चित्र असताना राज्यात संकट आली, अतिवृष्टी झाली, इतर संकटेही आली. मात्र, त्या सर्व संकटांवर मात करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे, असे पवार म्हणाले. रोगराईचे मोठे संकट देशावर आहे. कोरोनामुळे अनेक मर्यादा आहेत. मात्र, त्यामधून बाहेर पडू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. यावेळी जयसिंगराव गायकवाड पुन्हा राष्ट्रवादीत आल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला नक्की होईल, असेही पवार म्हणाले.

  • मराठवाड्याचा विकास करूया -

उद्या यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी बेरजेचे राजकारण केले. तेच काम शरद पवार यांनी केले. मध्ये एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला, आता जयसिंगराव यांनी प्रवेश केला. जयसिंगराव यांनी राज्यात आणि केंद्रात मंत्रिपद भूषवली आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार आहे. 26/11 च्या हल्ल्यावेळी 48 तास ताज हॉटेलमध्ये अडकले होते, असे प्रसंग त्यांच्या सोबत होऊन गेले पण ते डगमगले नाहीत. त्यांनी योग्य असेच निर्णय घेतले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे, आम्ही तुम्हाला साथ देऊ कोणतीही अडचण येऊ देणार नाही. मराठवाड्याचा विकास करूया, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

  • भाजपला हद्दपार करूया -

बीड जिल्ह्यासाठी जयसिंगराव गायकवाड यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रवेशानंतर मराठवाड्यात राष्ट्र्रवादीची ताकद उभी राहील. जयसिंगरावांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. बीड जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करूया, असा संकल्प आज आपण करूया, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. गेले अनेक वर्षे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष उभा केला आहे. मागे त्यात जयसिंगराव यांची भर पडली होती. मध्ये जयसिंगराव भाजपमध्ये गेले. त्यांना भाजप हा पक्ष बीड आणि राज्याच्या हितासाठी काम करत नाही हे लक्षात आल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. लोकांशी चांगला संपर्क असलेला नेता भाजपला कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे त्याचे स्वागत करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

  • भाजपमध्ये कोंडमारा -

जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर मनोगत व्यक्त करताना भाजपमध्ये कामाची कदर नाही, कामाचे कौतुक नाही अशा पक्षात कोण राहील, असे जयसिंगराव गायकवाड यांनी म्हटले आहे. 12 वर्ष भाजपमध्ये होतो. नितीन गडकरी यांचेही तिथे हाल होत आहेत, असेही जयसिंगराव म्हणाले. पक्षात कोंडमारा होतोय म्हणून मी राजीनामा दिला, आता मोकळा श्वास घेत आहे, असे ते म्हणाले. भाजपमध्ये मनमानी सुरू आहे, मी आणि मीच अशा लोकांसोबत राहायचं नाही असं मी ठरवलं आणि सर्व धर्मपंथाना सोबत घेणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केला, असे जयसिंगराव गायकवाड म्हणाले. राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लवकरच तेही पक्षात प्रवेश करतील, असे ते म्हणाले. भाजपने मला कोणतीही जबाबदारी दिली नाही, तुम्ही जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी पार पाडेन, भाजपबाबत मैदानात बोलेन, असेही जयसिंगराव म्हणाले.

हेही वाचा - ईडी कारवाई LIVE : प्रताप सरनाईक-संजय राऊत भेट; राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न - संजय राऊत

हेही वाचा - वीज बिले भरणार नाही; हिंमत असेल तर कनेक्शन तोडून दाखवा, राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.