ETV Bharat / city

शरद पवार- मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील बैठक संपली; विधान परिषदेच्या जागा वाटपावरून खलबते

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (सोमवार) दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या नियुक्तीसंदर्भात काही निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

Sharad Pawar CM meeting ended
शरद पवार मुख्यमंत्री बैठक संपली
author img

By

Published : Jun 22, 2020, 2:55 PM IST

Updated : Jun 22, 2020, 3:57 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (सोमवार) दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या नियुक्तीसंदर्भात काही निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख हेही उपस्थित होते. विधान परिषदेच्या जागेसोबतच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसला विधानपरिषदेत जागा निश्चित असून, त्यापैकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मिळणार आहे. तर इतर तीन नावांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

शरद पवार- मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील बैठक संपली; विधान परिषदेच्या जागा वाटपावरून खलबते
निसर्ग चक्रीवादळानंतर पवार यांनी कोकण दौरा केला होता. या दौऱ्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पवारांनी कोकणातील जनतेला अधिकची मदत जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावर अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर त्यातील काही राहिलेल्या त्रुटी आज पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या असल्याचे सांगण्यात येते.

Last Updated : Jun 22, 2020, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.