मुंबई- मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab malik ) यांना मुंबई सत्र न्यायालयाने खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता तात्पुरता दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचाराकरिता आज परवानगी दिली ( Nawab Malik allowed Treatment in private hospital ) आहे. उपचारादरम्यान नवाब मलिक यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत राहण्याची परवानगी देखील न्यायालयाने दिली आहे. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे. कुर्ला येथील जमीन व्यवहारात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरसोबत झालेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली ( Nawab Malik Daud Ibrahim Haseena Parkar ) होती. तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये ( Aurthur Road Jail ) न्यायालयीन कोठडीत आहेत.
मलिकांना किडनीचा त्रास : मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी त्यांनी देण्यात आली आहे. परवानगी जरी दिली असली तरी उपचारादरम्यान केवळ कुटुंबातील एकाच सदस्याला सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली होती. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल केला होता. अखेर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.
-
Special PMLA court allows Maharashtra Minister & NCP leader Nawab Malik to get treated at a private hospital.
— ANI (@ANI) May 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Malik's lawyer requested a private hospital medical treatment, to which ED didn't object, keeping some conditions. pic.twitter.com/AcZLfw6rts
">Special PMLA court allows Maharashtra Minister & NCP leader Nawab Malik to get treated at a private hospital.
— ANI (@ANI) May 13, 2022
Malik's lawyer requested a private hospital medical treatment, to which ED didn't object, keeping some conditions. pic.twitter.com/AcZLfw6rtsSpecial PMLA court allows Maharashtra Minister & NCP leader Nawab Malik to get treated at a private hospital.
— ANI (@ANI) May 13, 2022
Malik's lawyer requested a private hospital medical treatment, to which ED didn't object, keeping some conditions. pic.twitter.com/AcZLfw6rts
मलिकांच्या पायांना सूज : जे. जे. रुग्णालयाऐवजी मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात लवकरात लवकर वैद्यकीय उपचार होणे गरजेचे आहे. असा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता. सक्तवसुली संचालनालयाने त्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे न्या. राहुल रोकडे यांनी मलिक यांच्या वैद्यकीय अहवालाबरोबरच जे. जे.मध्ये आवश्यक सुविधा आहे की नाहीत याचा अहवाल देण्याचे निर्देश ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मला मूत्रपिंडाचा आजार असून त्यामुळे पायांना सूज येत आहे. त्याशिवाय अनेक आजार आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरुपी उपचार करण्याची इच्छा असल्याने सहा आठवड्यांपुरता जामीन मंजूर करण्यात यावा असा अर्ज मलिक यांनी केला होता.
हेही वाचा : Sameer Wankhede : नवाब मलिकांवर प्रश्न विचारताच समीर वानखेडे म्हणाले.. नाही, नको नको