ऋषिकेश - मुंबईवरून ऋषीकेषला पर्यटनासाठी गेले असताना दोन मुले आणि एक मुलगा बुधवारी गंगा नदीत आंघोळीला गेले होते. यावेळी मधुश्री खुरसंगे, अपूर्वा केळकर आणि मेलरॉय दांतेस हे तिघे जण वाहून गेले. आतापर्यंत तिघांपैकी एकाचे शव मिळाले असून बाकीच्यांचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यावर त्यांनी घरी एकच आक्रोश केला.
शुक्रवारी रात्री, रेस्क्यू टीमचे मुख्य एसआयई कविंद्र सजवाणच्या नेतृत्वाखाली केलेल्या शोधकार्यात अपूर्वा केळकर या तरुणीचे शव गौहर रायवाला येथे सापडले असून ते पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेनंतरही एसडीआरएफची टीम गंगा नदीत शोधकार्य करत आहे. एसडीआरएफच्या टीमचे प्रमुख कविन्द्र सिंह यांनी सांगितले की, ऋषिकेशमध्ये तपोवनपासून ते भीमगौड़ा बॅरेजपर्यंत शनिवारी शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आले. ज्या ठिकाणी हे तिघे बुडाले, त्या ठिकाणी मोठे शोधकार्य सुरू होते. यासाठी पाणबुड्यांचीही मदत घेतली जात आहे.
औषध निर्मितीसंदर्भातील घेत होते शिक्षण -
या घटनेचा माहिती खुरसंगे कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांच्या घरात एकच आक्रोश झाला. यावेळी घरच्यांनी सांगितले की, मुले डॉक्टरांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणार होती. या 5 जणांपैकी 3 जण औषध निर्मितीसंदर्भातील शिक्षण घेत होते. विदेशात जाण्यापूर्वी देवदर्शनासाठी ते गेले होते. पाच जणांपैकी निशा गोस्वामी आणि करण मिश्रा वाचले.
हेही वाचा - केंद्राच्या 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'चा राज्यांना फटका; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचा केंद्रावर निशाणा