ETV Bharat / city

मुंबईत २३ नोव्हेंबर नव्हे तर, १ जानेवारीला शाळा होणार सुरू! - school information mumbai

मुंबईत २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणे शक्य नाही. मात्र, १ जानेवारीपासून शाळा सुरू करता येऊ शकतात, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे.

पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल
पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल
author img

By

Published : Nov 20, 2020, 2:19 PM IST

Updated : Nov 20, 2020, 3:48 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आणि दिल्लीमध्ये वाढणारे रुग्ण बघता मुंबईत २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणे शक्य नाही. मात्र, १ जानेवारीपासून शाळा सुरू करता येऊ शकतात, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे.

मुंबईत २३ नोव्हेंबर नव्हे तर, १ जानेवारीला शाळा होणार सुरू

शिक्षणमंत्र्यांचा आदेश -

मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला. मार्चपासून सर्व व्यवहार बंद झाले. शाळाही बंद झाल्या. इतकेच नव्हे तर, दहावीचा एक पेपरही रद्द करण्यात आला. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यावर ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील, असे नुकतेच सांगितले होते. मात्र आता पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

नव्या वर्षात शाळा-

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात आणि भारतात दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती. थंडीही सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणावरून येत्या २३ नोव्हेंबरपासून मुंबईमधील शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी म्हटले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईत शाळा सुरू करणे शक्य नाही. नव्या वर्षात म्हणजेच १ जानेवारीपासून मुंबईतील शाळा सुरू करता येऊ शकतात, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

हेही वाचा- राज्यातील वाहनविक्रीत वाढ, 2500 कोटींचा महसूल प्राप्त

हेही वाचा- पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणताही हवाई हल्ला झालेला नाही; लष्कराचे स्पष्टीकरण

Last Updated : Nov 20, 2020, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.