मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसपासून मुक्तीसाठी उद्योगपतींनी सीएसआर फंडामधून मदत करावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच ऑल इंडिया रेल्वे एससी एसटी एप्लॉईज असोसिएशनचे सदस्य असलेल्या साडेतीन लाख कर्मचाऱ्यांकडून आपला एक दिवसाचा पगार पंतप्रधान निधीसाठी दिला जाणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगाराचे ७० कोटी रुपये होतात. ते पंतप्रधान निधीसाठी दिले जाणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बी एल बैरवा यांनी दिली आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने दहशत माजवली आहे. भारतातही या व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. सरकारला मदत करण्यासाठी उद्योगपती आणि सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारला मदत करता यावी म्हणून रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ऑल इंडिया एससी एसटी एम्प्लॉईज असोसिएशनने आपल्या साडेतीन लाख कर्मचाऱ्यांचा दिवसाचा २ हजार रुपये प्रमाणे ७० कोटी रुपये पंतप्रधान निधीसाठी देण्याचे जाहीर केले आहे. तसे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे. भारतातील रेल्वेत काम करणाऱ्या एससी एसटी संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपला एक दिवसाचा पगार कापून देण्यासाठी विभागीय मॅनेजरांना पत्र द्यावे, असे आवाहन बी एल बैरवा यांनी केले आहे.