मुंबई : जातीय तेढ निर्माण केल्याच्या राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य (Rana Couple in Jail) तुरुंगात आहे. या राजद्रोहाच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे म्हटलं होतं. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली असून 'राजद्रोहा कायद्याबाबतची शरद पवार यांची भूमिका राष्ट्रव्यापी' असल्याचे म्हटले आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - ED Summons to Bhavna Gawali : खासदार भावना गवळी यांना ईडीकडून पुन्हा समन्स; 5 मे रोजी हजर राहण्याचे निर्देश
हा एक संशोधनाचा विषय
"उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आलेले आहे. अशा प्रकारच्या आदेशाचे पालन महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे. मला वाटत महाराष्ट्र सरकार नेहमी कोर्टाच्या आदेशाचे पालन करत. आता योगी कोण आणि भोगी कोण, या संदर्भात मत परिवर्तन कसे झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्याला पीएचडी करायची असेल तर त्याने करावी.' असेही राऊत यांनी म्हटले आहे.
त्याचेच प्रतिबिंब आज अग्रलेखात
"पंतप्रधानांना लक्ष्य केले असे म्हणता येणार नाही. जी भूमिका स्पष्ट करायचे आहे ते आम्ही मांडली. ज्या राज्यात त्यांचे मुख्यमंत्री नाही राज्यांवर त्यांनी परवाच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारची टीका केली. प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. देशाचे प्रधानमंत्री हे संपूर्ण देशाचे असतात. ज्या राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार नाही त्या राज्यात बाबत प्रधानमंत्री यांनी जास्त संवेदनशील असायला हवे. याला आपण लोकशाही म्हणतो मात्र दुर्दैवाने महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यांना सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते. म्हणून उद्धवजी ठाकरे वारंवार आवाज उठवत असतात आणि त्याचेच प्रतिबिंब आज अग्रलेखात दिसून आले." असं राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Hanuman Chalisa Case : राणा दाम्पत्याचा फैसला टळला, वेळ नसल्याने न्यायालय उद्या घेणार सुनावणी