मुंबई- शिवसेनेत बंड झाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे ( Shivsena Party crisis ) मोठे संकट निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकनिष्ठ असल्याचे दाखवून देणारे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut on party loyalty ) यांनी केले आहे. ईडीने त्यांना आज हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे. यापूर्वी आपल्याला शिंदे गटाकडून गुवाहाटीत बोलाविणे आले होते, असाही त्यांनी गौप्यस्फोट केला होता.
शिवसेनेने शिंदे गट आणि शिंदे सरकार स्थापनेला आव्हान दिलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. ईडीपुढे झुकणार नाही, असे यापूर्वी अनेकदा संजय राऊत ( ED Probe of Sanjay Raut ) यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात हात घेत चालत असलेला फोटो ट्विट केला आहे.
-
संसार में सबसे आसान काम
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
अपनेको धोखा देना हैं...!
प्रेमचंद. pic.twitter.com/5ysO2XE86t
">संसार में सबसे आसान काम
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2022
अपनेको धोखा देना हैं...!
प्रेमचंद. pic.twitter.com/5ysO2XE86tसंसार में सबसे आसान काम
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2022
अपनेको धोखा देना हैं...!
प्रेमचंद. pic.twitter.com/5ysO2XE86t
शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असल्याची नुकतेच केली टीका-कोणत्याही लढाईसाठी दोन हात करण्याची ( Shivsena Leader Sanjay Raut ) तयारी आहे. छुपे वार सुरू आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न आहे. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दौरे होणारच अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर झालेली आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र दिल्लीमध्ये आपले सरकार वाचविण्यासाठी आले आहेत. दिल्लीत ते निवडणूक आयोगाकडे जातील, आणखी कुठे कुठे जातील. कारण ते आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत. ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, अशी टिकाही संजय राऊत यांनी केली.
पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स-शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांची आठ तास चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांना आज ( 20 जुलै ) चौकशीला हजर राहण्याचे निर्देश ईडीने समन्समधून देण्यात आले आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीने चौकशीकरिता बुधवारी (20 जुलै) मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती.
संजय राऊतांचे निकटवर्तीयांची चौकशी - संजय राऊत यांना ईडीच्या मुंबई कार्यालयाकडून मंगळवारी समन्स बजावण्यात आले आहे. बुधवारी 20 जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे. याच प्रकरणी ईडीने आज संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. पण आता राऊतांना नोटीस बजावली असून उद्या त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.