ETV Bharat / city

Sanjay Raut On Kashmiri Pandit Attack : 'काश्मिरी पंडितांवर सातत्याने होणारे हल्ले हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अपयश' - काश्मिर पंडीत हल्ले

काश्मिरी पंडितांसाठी ( Kashmir Pandit ) जे जे शक्य होईल, ते ते करून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी म्हटले होते. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा तीच री ओढत काश्मिरी पंडित यांच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) पूर्णपणे अपयशी ( Sanjay Raut Criticized PM Modi ) ठरल्याचं सांगितलं आहे.

Attack On Kashmir Pandit Sanjay Raut Reaction

author img

By

Published : Jun 5, 2022, 10:57 AM IST

मुंबई - काश्मिरी पंडितांसाठी ( Kashmir Pandit ) जे जे शक्य होईल, ते ते करून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी सांगितल्यानंतर आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा तीच री ओढत काश्मिरी पंडित यांच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Sanjay Raut Criticized PM Modi ) पूर्णपणे अपयशी ठरल्याचं सांगितलं आहे. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी ते बोलत होते.

नरेंद्र मोदींचे अपयश? - गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडित आणि हिंदूंना लक्ष्य करत त्यांचे हत्याकांड काश्मिर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आली आहे. भयभीत काश्मिरी पंडित यांचे पलायन सुरू झाले आहे. याबद्दल काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्यावर बोलताना आज शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, काश्मिरी पंडितांवरील हल्ले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अपयश आहे. मोदी सरकार काश्मिर फाईल्स ( Kashmir Files ) चित्रपट प्रमोट करण्यात व्यस्त आहे. अयोध्येत आमचं शक्तिप्रदर्शन नाही. आम्ही अयोध्येला श्रद्धेने जातो. काल मुख्यमंत्र्यांनी काश्मिरी पंडिताविषयी मनापासून संवेदना व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकार व शिवसेना काश्मिरी पंडित या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

मशिदीत शिवलिंग कसले शोधता? - काश्मिरी पंडित व शिवसेनेचे एक नातं कायम राहिलं आहे. यावर भाजप टीका कशी करू शकते. काश्मिरी पंडित मरत आहेत, त्यांच्यावर बोला. मोदी सरकारने काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे वचन दिलं होतं, त्याच काय झालं? आठ वर्षांपासून काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू आहे आणि भाजपचे प्रमुख लोक मात्र सिनेमा प्रमोशनमध्ये (Film promotion ) व्यस्त असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे. तसेच मशिदीत शिवलिंग शोधणारे काश्मिरी पंडित यांच्या मुद्द्यावर गप्प का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री? - १९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने काश्मिरी पंडित यांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला. महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायम संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेने त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे, ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल, असे मुख्यमंत्र्यांनी काश्मिरी पंडिता विषयी काल म्हटले होते.

हेही वाचा - Uddhav Thackeray On Kashmiri Pandit Issue : काश्मिरी पंडितांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.